Milk Price Hike:दूध दरात दोन रुपयांनी वाढ;’या’दिवशीपासून लागू होणार नवे दर

0
Milk Price Hike:दुध दरात दोन रुपयांनी वाढ;'या'दिवशीपासून लागू होणार नवे दर
Milk Price Hike:दुध दरात दोन रुपयांनी वाढ;'या'दिवशीपासून लागू होणार नवे दर

नगर : राज्यात आता उन्हाच्या झळा जाणवू लागल्यात. उन्हाळ्यामुळे आता दूध संकलनात घट झाली आहे.तसेच आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी(Milk Deamand) वाढली आहे. त्यामुळे दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ (Increase by two rupees per liter) करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. दुधाची नवी दरवाढ (Price hike)उद्या (ता.१५) शनिवारपासून लागू होणार आहे.

नक्की वाचा : अक्षर पटेल आता दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार!

बैठकीत काय घडलं ?(Milk Price Hike)

पुण्यातील कात्रज दूध संघात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक संघटनेचे ४७ सदस्य उपस्थित होते. या बैठकीत गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये दूध भेसळ आणि पनीर भेसळ रोखण्यावर सविस्तर चर्चा झाली. भेसळ आणि शेतकऱ्यांचे थकीत अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव मस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली.

अवश्य वाचा : सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढला!  

सध्याचे दर काय?(Milk Price Hike)

येत्या १५ मार्चपासून गायीच्या दूधाची किंमत ५४ ते ५६ रुपयांवरुन ५६ ते ५८ रुपये इतकी होणार आहे. तर म्हशीच्या दूधाची किंमत ७० ते ७२ रुपयांवरुन ७२ ते ७४ रुपये इतकी होणार आहे. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here