Milk producer : नगर : नगर जिल्ह्यात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधनाचा विकास आणि दुग्धोत्पादनाला चालना देण्यात आली आहे. राज्यातील सहकारी दूध संघ आणि खासगी प्रकल्पांना दूध पुरविणाऱ्या दूध उत्पादक (Milk producer) शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये प्रमाणे जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ९९९ दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै २०२४ अखेर ९६ कोटी १९ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले.
नक्की वाचा: शिर्डी विमानतळाच्या नवीन इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
लिटरमागे सात रुपयांचे अनुदान
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये, दूध भुकटी निर्यातीस ३० रुपये प्रति किलो प्रोत्साहनपर अनुदान आणि राज्यांतर्गत उत्पादित होणाऱ्या दूध भुकटीस प्रति लिटर १ रुपये ५० पैसे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. जिल्ह्यातील २ लाख ७ हजार ८८४ दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै २०२४ अखेर ३० कोटी ७१ लाख रुपयांचे अनुदानाचा लाभ झाला. सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
११ लाख पशुचं लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण (Milk producer )
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ९ लाखाहून अधिक पशुंचे लाळ खुरकुत आणि पीपीआर लसीकरण, तर ११ लाखापेक्षा अधिक पशुचं लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. लम्पी चर्मरोगामुळे मृत झालेल्या ४ हजार ७७६ पशुंबद्दल पशुपालकांना १२ कोटी २० लाख ८१ हजार रुपये वितरीत करण्यात आले. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुखाद्य व वैरणाची ३ आणि शेळी-मेंढी पालनाची ९ प्रकरणे मंजूर करण्यात आली.