Milk Producer : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार

Milk Producer : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार

0
Milk Producer : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार
Milk Producer : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार

Milk Producer : अकोले : दुधाला प्रति लिटर 40 रुपयांचा भाव (Milk Price) मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेरिंगचे धोरण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयस्तरीय (Ministry) तिसरी बैठक अपयशी ठरली आहे. त्यामुळे दूध उत्पादक (Milk Producer) शेतकरी संघर्ष समिती आपला लढा अधिक तीव्र करणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले (Dr Ajit Nawale) यांनी सांगितले.

अवश्य वाचा : आरक्षणाचे खरे शत्रू काेण?; शरद पवारांचे नाव न घेता मंत्री विखेंची टीका

दुधाला 40 रुपये प्रतिलिटर भाव देण्याची मागणी

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने पाच जणांचे शिष्टमंडळ या बैठकीसाठी पाठवण्यात आले होते. सदाशिव साबळे, विनोद देशमुख, प्रकाश देशमुख, नीलेश तळेकर, नामदेव साबळे यांचा यामध्ये समावेश होता. राज्यभरातील इतरही विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये राज्यभरातील दूध संघ, दूध कंपन्या व पशुखाद्य कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर दुधाला किमान 40 रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, पशुखाद्याचे दर कमी करावेत व दूध प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, ही आग्रही मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी केली.

नक्की वाचा : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी

30 रु. सुद्धा देता येणार नसल्याची दूध संघांची भूमिका (Milk Producer)

संघर्ष समितीच्या या भूमिकेला खासगी दूध कंपन्यांचे प्रतिनिधी व इतर हितसंबंधीयांनी बैठकीत तीव्र विरोध केला व 40 रुपयेच काय 30 रुपये सुद्धा दूध उत्पादकांना देता येणार नाही, अशी भूमिका खासगी व सहकारी दूध संघांच्या अनेक प्रतिनिधींनी घेतली. दुर्दैवाने या कंपन्यांच्या व संघांच्या एकजुटीच्या समोर राज्य सरकार हतबल असल्याचे चित्र बैठकीमध्ये दिसत होते. परिणामी दुधाला 40 रुपये देता येणार नाही अशाप्रकारची भूमिका त्यांच्याकडून बैठकीत अधोरेखित करण्यात आली. शेतकऱ्यांची ही घोर उपेक्षा संघर्ष समिती कदापि सहन करणार नाही. अहमदनगर जिल्ह्यातील कोतूळ याठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. जिल्ह्यातील इतरही भागात वेगवेगळ्या ठिकाणी दूध उत्पादकांची आंदोलने सुरू आहेत. सांगली सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, संभाजीनगर, इत्यादी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा विस्तार झालेला आहे. दूध उत्पादकांमध्ये सरकारच्या व दूध कंपन्यांच्या भूमिकेमुळे तीव्र असंतोष खदखदतो आहे. अशा पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आपला लढा अधिक तीव्र करण्याचे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here