Milk Producer : दूध हंडी आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Milk Producer : दूध हंडी आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Milk Producer : दूध हंडी आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Milk Producer : दूध हंडी आंदोलनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Milk Producer : अकोले : दूध उत्पादक (Milk Producer) शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतूळ येथे शेतकरी गेली दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज येथील बाजारपेठ बंद (Market Closed) ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्याकडे सरकारचे (Govt) लक्ष वेधले.

नक्की वाचा: महाराष्ट्राला स्वाभिमानाची परंपरा – संजय राऊत

शेकडोच्या संख्येने शेतकरी यावेळी एकत्र

कोतूळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकरी यावेळी एकत्र आले होते. आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्याचे आंदोलन यावेळी करण्यात आले. वारकरी संप्रदायाने यावेळी आंदोलनाला पाठिंबा दिला. अभंग व भजनाच्या निनादांमध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली व सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

अवश्य वाचा: जिओ,एअरटेलला धक्का; टाटा आणि बीएसएनएलमध्ये मोठा करार

दुधाला प्रतिलिटर 40 रु भाव देण्याची मागणी (Milk Producer)

दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळाला पाहिजे, दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केले पाहिजे, पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे. दूध हंडी फोडण्याच्या अभिनव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत या आंदोलनात भागीदारी केली.


दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने 15 जुलै ते 21 जुलै राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. आज पहिल्याच दिवशी दूध हंडी फोडून या आंदोलनाची सुरुवात झाली असून महाराष्ट्रभर विविध पद्धतीने हे आंदोलन पुढे जाणार आहे. या आंदोलनात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, विनोद देशमुख,अभिजीत सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बी.जे. देशमुख, सीताराम देशमुख, राजू देशमुख, बाळासाहेब गिते, विजय वाकचौरे, राजेंद्र गवांदे, गौतम रोकडे, नीलेश तळेकर, नामदेव भांगरे, राजाराम गंभीरे, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजीत भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here