Milk Producer : नगर : राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न (Milk Rate) सोडविण्यासाठी अमूल उद्योग (Amul Milk) समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्त २० लाख लीटर दुधाचे संकलन करावे, असे आवाहन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले आहे. या प्रक्रिया केंद्रानी सहकार्य केल्यास राज्यातील दूध उत्पादकांना (Milk Producer) ३५ रुपये भाव देणे शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा: महारक्तदान शिबिराची दखल देशपातळीवर घेतली जात आहे : संग्राम जगताप
दूध दराचा निर्णय लागू करण्यासाठी मंत्री विखे प्रयत्नशील
राज्य सरकारने दूधाच्या दरासंदर्भात घेतलेला निर्णय राज्यात तातडीने लागू करता यावा, यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राज्यासह बाहेरच्या राज्यात जाणाऱ्या दूधाला सुद्धा शासनाने लागू केलेले दर मिळावेत, यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात दूध व्यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्राच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अमूल, पंचमहाल, युनियन, कैरा युनियन, वलसाड, सुमूल येथील युनियनचे प्रतिनिधी यांच्यासह दूग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड आणि विभागाचे आधिकारी उपस्थित होते.
अवश्य वाचा: नगरमध्ये नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा; देशभरातील खेळाडूंचा राहणार सहभाग
प्रक्रिया केंद्रांच्या अनुदानाबाबत सरकार सकारात्मक (Milk Producer)
मंत्री विखे पाटील यांनी या सर्व प्रतिनिधींशी संवाद साधताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३-५, ८-५ फॅटसाठी शासनाने ठरवून दिलेला ३५ रुपयांचा दर लागू करावा, असे आवाहन केले. दर लागू करण्यासाठी काही अडचणी असल्यास विभागाकडून सोडविण्यासाठी निश्चित पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ज्याप्रमाणे राज्यातील प्रक्रिया केंद्राना दूध पावडर उत्पादनासाठी दिले जाणारे अनुदान परराज्यातील प्रक्रिया केंद्रानाही मिळावे, अशी मागणी उपस्थित प्रतिनिधींनी केल्यानंतर याबाबत सरकार सकारात्मकतेने विचार करेल, असे त्यांनी सांगितले.
सद्य परिस्थितीत राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी प्रक्रिया केंद्रानी २० लाख लीटर दूधाचे संकलन करण्यासाठी सहकार्य करावे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूधाचा प्रश्न मार्गी लागला जाईल. यामुळे होणारे आर्थिक नुकसानही टळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच दुधाला हमीभाव मिळावा, यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची आपण व्यक्तिगत भेट घेऊन याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती आपण केली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत सांगितले. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार आतिशय संवेदनशील आहे. दूधाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, असेच प्रयत्न केले जात आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्व पातळीवर उपाय योजना करण्याचे काम सुरु असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.