Milk producer : कोतूळ येथील धरणे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरूच

Milk producer : कोतूळ येथील धरणे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरूच

0
Milk producer : कोतूळ येथील धरणे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरूच
Milk producer : कोतूळ येथील धरणे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरूच

Milk producer : अकोले: दुधाला किमान ४० रुपये भाव द्या व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, या प्रमुख मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने  ६ जुलैपासून सुरु असलेले कोतूळ (ता. अकोले) येथील बेमुदत धरणे आंदोलन आज तेराव्या दिवशीही सुरूच आहे. आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने आंदोलनाचा राज्यव्यापी लढा सुरू करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. १९ तारखेला (शुक्रवारी) ज्येष्ठ नेते शरद पवार अकोल्यात शेतकरी मेळावा स्व. अशोक भांगरे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असल्याने शेतकऱ्यांच्या या लढ्याविषयी ते काय भूमिका घेतात, याकडे आता दूध उत्पादकांचे (Milk producer) लक्ष लागले आहे.

नक्की वाचा: मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करणार? वाचा सविस्तर

राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला

दुधाचे भाव वर्षभर सातत्याने कोसळत असल्याने राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आले आहेत. उत्पादन खर्च पाहता दुधाला किमान ४० रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. सरकार मात्र अनुदानाचे नाटक करून वेळ मारून नेत आहे. मागील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, अनुदानासाठी इतक्या अटी-शर्ती लावल्या की राज्यभरातील २० टक्के शेतकऱ्यांना सुद्धा अनुदानाचा लाभ मिळाला नाही. देशभरात साडेतीन लाख टन दूध पावडर पडून आहे. शेतकरी भावासाठी आंदोलन करून देशातील दूध पावडर निर्यात करण्याची मागणी करत आहेत. केंद्रातील सरकार मात्र उलट मोठ्या प्रमाणात पावडर आयातीला परवानगी देत आहे.

अवश्य वाचा: माेहरम विसर्जन मिरवणूक शांततेत

सर्वच शेतीमालाचे भाव सरकारने पाडले (Milk producer)

दुधाबरोबरच आयात-निर्यातीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे कांदा, सोयाबीन, कापूस, तेलबिया, डाळी, टोमॅटो यांसारख्या सर्वच शेतीमालाचे भाव सरकारने पाडले आहेत, या पार्श्वभूमीवर सुरू असलेले हे आंदोलन व्यापक करण्याचा इशारा दूध उत्पादक संघर्ष समितीने दिला आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनी या आंदोलनास भेट देत पाठिंबा दर्शविला. केंद्र व राज्य शासनाकडे आपण आंदोलकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करू असे सांगत दूध भेसळ प्रतिबंधक कायदा कठोर करणे तसेच पशुखाद्यांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे याबाबत कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आंदोलकांच्या पाठीशी आपण असून आंदोलकांच्या मागण्या रास्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here