Milk producer : दूध उत्पादक मोर्चेकऱ्यांनी महामार्गावर शेण ओतून केला निषेध

Milk producer : दूध उत्पादक मोर्चेकऱ्यांनी महामार्गावर शेण ओतून केला निषेध

0
Milk producer : दूध उत्पादक मोर्चेकऱ्यांनी महामार्गावर शेण ओतून केला निषेध
Milk producer : दूध उत्पादक मोर्चेकऱ्यांनी महामार्गावर शेण ओतून केला निषेध

Milk producer : संगमनेर : दुधाला ४० रुपये हमीभाव (Milk Price) मिळावा, यासाठी कोतूळ येथून निघालेली शेतकरी ट्रॅक्टर रॅली संगमनेर शहरातील विश्रामगृहासमोर आल्यानंतर दूध उत्पादक मोर्चेकऱ्यांनी पुणे (Pune) – नाशिक मार्गावर शेण ओतून आपला निषेध नोंदवला. यावेळी शेतकरी नेते कॉ. डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale) यांनी दूध उत्पादक (Milk producer) शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत दुधाला ४० रुपये भाव देण्याची मागणी केली.

अवश्य वाचा: मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकार १०० टक्के रक्कम भरणार – अजित पवार

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

राज्यात बनावट दूध, दूध संघांची मनमानी, शासनाचे उदासीन धोरण, जनावरांच्या खाद्य कंपन्यांशी संगनमत यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. प्रचंड कष्ट करून देखील शेतकऱ्यांच्या वाट्याला शेणापेक्षा अधिक काही उरत नाही. त्यामुळे हे शेण पण तुम्हालाच राहू द्या, असे सांगत कॉ. डॉ. अजित नवले व उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करत संताप व्यक्त केला. यावेळी कॉ. डॉ. अजित नवले यांनी शेतकरी कोतूळ येथून संगमनेरला येऊ शकतो, तर तो लोणी आणि मुंबईला देखील जाऊ शकतो, असा इशारा दिला.

नक्की वाचा: अर्थसंकल्पात मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचं शैक्षणिक कर्ज

कोतूळ ते संगमनेर असा ट्रॅक्टर मोर्चा (Milk producer)

संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारत शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले आणि या मोर्चाची सांगता झाली. दूध दर वाढीसाठी कोतूळ ते संगमनेर असा ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे, याची माहिती संगमनेरकरांना होती. परंतु हा मोर्चा शहराबाहेरच अडवला जाईल, असे वाटत असताना दुपारी चारच्या दरम्यान हा मोर्चा अकोले रोडवरून नवीन अकोले रोडमार्गे बसस्थानकावर आला. शासकीय विश्रामगृहासमोर महामार्गावर एका रांगेत स्थिरावला. शेतकऱ्यांची मागणी, त्यांची शिस्त यामुळे संगमनेरकर भारावले आणि एक आगळावेगळा मोर्चा संगमनेरकरांना पहायला मिळाला.


शेती व दूध व्यवसाय व्यापारीदृष्ट्या अत्यंत अडचणीचा झाल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन १८ दिवस कोतुळ येथे चालू असताना सत्ताधारी निबर कातडीचे होऊन दुर्लक्ष करतात तेव्हा ते शेतकरी विरोधी असल्याचे दिसते म्हणून शेतकरी संघर्ष मोर्चे काढतात. आजच्या मोर्चास लागलेले डिझेल, गेलेला दिवस, अर्धपोटी राहून सरकारला जागे करण्यासाठी लढा देणारे शेतकरी एक दिवस ही जुलमी सत्ता उलथून टाकल्याशिवाय राहणार नाहीत, अशीही प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here