Milk Producers : नगर : सहकारी दूध संघांमार्फत (Cooperative Milk Organization) संकलित होणार्या जिल्ह्यातील २०४ प्रकल्पांमधील दूध उत्पादक (Milk Producers) शेतकर्यांच्या खात्यावर पाच रूपये प्रमाणे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यातील १५२ कोटी १२ लाख रूपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे. मात्र अजुनही सप्टेंबर महिन्यातील २७ कोटी ८७ लाख रूपये अनुदान वाटप होणे बाकी आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर (Government) पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापही शासनाकडून रखडलेले अनुदान दूध उत्पादकांना वितरित झालेले नाही.
नक्की वाचा : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार;केंद्र सरकारचा निर्णय
उत्पादकांचे २७ कोटी ८७ लाख रूपये अनुदान प्रलंबित
राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांचे आर्थिकहित विचारात घेऊन शासनाने प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यासाठी सहकारी दूध उत्पादक शेतकर्यांनी ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ दुधासाठी प्रतिलिटर २९ रूपये शेतकर्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच शेतकर्यांच्या खात्यात शासनाच्या वतीने पाच रूपये प्रतिलिटर वर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उत्पादकांचे २७ कोटी ८७ लाख रूपये अनुदान प्रलंबित आहे. सप्टेंबरचे अनुदान मिळालेले नसताना राज्य सरकारने अनुदानात प्रतिलिटर दोन रूपयांची वाढ केली. त्यामुळे दूध उत्पादकांना १ ऑक्टोबरपासून सात रूपये प्रतिलिटर अनुदान मिळणे अपेक्षित आहे. पण दोन महिने झाले तरी अनुदानाची प्रतीक्षा संपलेली नाही.
अवश्य वाचा : मुंबईतून अपहरण झालेल्या चिमुकल्याची श्रीरामपुरात सुटका
प्रत्यक्ष खात्यावर पैसे वर्ग न झाल्याने शेतकरी चिंतेत (Milk Producers)
सध्या ऑक्टोबर महिन्याचे प्रस्ताव पाठविण्याचे काम सुरू आहे. हे काम येत्या १५ दिवसात पूर्ण होवून अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात सप्टेंबर महिन्याचे अनुदान रखडले असतांना ऑक्टोबर महिन्यात सात रूपये प्रमाणे अनुदान वाटप करणे अवघड आहे. अनुदान देण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याला २०० कोटी रूपये लागणार आहे. वाढीव अनुदानाची निव्वळ घोषणा झाली; पण प्रत्यक्ष खात्यावर पैसे वर्ग न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
सात रूपये अनुदानाची प्रतिक्षाच
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकर्यांना दोन रूपये वाढ करून सात रूपये अनुदान देण्याची घोषणा केली. ऑक्टोबर- नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी हे अनुदान दिले जाणार होते. मात्र अजूनही सप्टेंबर महिन्याचे पाच रूपये प्रमाणे पूर्णपणे अनुदानाचे वाटप न झाल्याने ऑक्टोबरपासून सात रूपये प्रमाणे देण्यात येणार्या अनुदानाचे वाटप रखडले आहे. दरम्यान, दूध अनुदान देण्याची योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. ती यापुढे सुरू ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी अध्यक्ष व गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे तालुका दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.