Vidhansabha 2024:माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला,अजित पवार गटाकडून मिनल साठे मैदानात  

0
Vidhansabha 2024:माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला, अजित पवार गटाकडून मिनल साठे मैदानात  

नगर : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला आहे. विविध मतदारसंघातून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेत. त्यातच माढा विधानसभा मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अखेर अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांना उमेदवारी मिळाली आहे. महायुतीचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरु असताना अखेर माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरलाय. माढ्याच्या नगराध्यक्ष आणि काँग्रेसच्या नेत्या अॅड. मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे.

नक्की वाचा : एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ!

मिनल साठे यांना महायुतीकडून उमेदवारी (Vidhansabha 2024)

माढ्यात विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढ्याच्या नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या नेत्या मिनल साठे यांना महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे. मिनल साठे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, त्यांना डावलून शरद पवारांनी अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट मिळवलं आहे. त्यामुळं माढ्याच्या मैदानात आता तिरंगी लढत रंगणार आहे.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here