Minimum Balance : नगर : पूर्वी बँक ग्राहकांनी खात्यात मिनिमम बॅलन्स (Minimum Balance) न ठेवल्यास दंड आकारला जात होता. परंतु आता इंडियन बँक (Indian Bank), SBI बँक (SBI Bank), कॅनरा बँक आणि PNB बँक यांनी सेव्हिंग खात्यांवरील (Savings Account) मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट रद्द केली आहे. यामुळे सेविंग अकाउंट असणाऱ्या लाखो ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास धोका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी
या निर्णयामुळे ग्राहकांचा फायदा
यामुळे बँक ग्राहकांनी खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास त्यांच्याकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही. या निर्णयामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ, ग्राहकाभिमुख आणि पारदर्शक होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
बचत खात्यात ठरावीक किमान शिल्लक ठेवणं बऱ्याच बँकांसाठी आवश्यक असतं. जर खात्यात हा किमान बॅलन्स नसेल, तर बँका दंड आकारतात. मात्र, आता देशातील चार मोठ्या बँकांनी हा नियम हटवून खातेदारांना दिलासा दिला आहे. म्हणजेच, आता खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास कुठलाही दंड द्यावा लागणार नाही.
अवश्य वाचा : अमराठी व्यावसायिकांची मनसेविरोधात एकजूट, मीरा भाईंदरमध्ये मारहाणीवरुन आक्रमक
या दिवसापासून नियम होणार लागू (Minimum Balance)
- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 2020 मध्येच आपल्या सर्व बचत खात्यांवरील मिनिमम बॅलन्सची अट रद्द केली होती.
- इंडियन बँकेने आपल्या सर्व प्रकारच्या सेव्हिंग्स अकाउंट खातेदारांना 7 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू होतील.
- कॅनरा बँक ग्राहकांसाठी हा मिनिमम बॅलन्स रद्दचा निर्णय मे 2025 मध्ये घेतला आहे. त्यांनी रेग्युलर सेव्हिंग्स, सॅलरी आणि एनआरआय सेव्हिंग्स अशा सर्व खात्यांवरील मिनिमम बॅलन्सची अट हटवली आहे.
- PNB बँक अर्थात पंजाब नॅशनल बँकेनेही जाहीर केलं आहे की, सर्व सेव्हिंग्स खात्यांवर मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही.
या बदलामुळे अनेकांना आर्थिक नियोजन करताना ताण येणार नाही. गरज असताना खात्यात असलेला सर्व पैसा वापरणं शक्य होईल. या निर्णयामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ, ग्राहकाभिमुख आणि पारदर्शक होईल.