Mirzapur Season 3 Release: प्रतीक्षा संपली!’मिर्झापूर सीझन ३’ची रिलीज डेट जाहीर

मागील अनेक दिवसांपासून चाहते 'मिर्झापूर सीझन ३' या वेबसिरीजची वाट पाहत आहेत. आता या क्राईम-थ्रिलर वेब सीरिज 'मिर्झापूर सीझन ३' ची (Mirzapur Season 3) रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात (Release Date Announced) आली आहे.

0
Mirzapur Season 3 Release: प्रतीक्षा संपली!'मिर्झापूर सीझन ३'ची रिलीज डेट जाहीर
Mirzapur Season 3 Release: प्रतीक्षा संपली!'मिर्झापूर सीझन ३'ची रिलीज डेट जाहीर

नगर : मागील अनेक दिवसांपासून चाहते ‘मिर्झापूर सीझन ३’ या वेबसिरीजची वाट पाहत आहेत. आता या क्राईम-थ्रिलर वेब सीरिज ‘मिर्झापूर सीझन ३’ ची (Mirzapur Season 3) रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात (Release Date Announced) आली आहे. मागील काही दिवसांपासून प्राईम व्हिडीओकडून अनेक कोडी टाकण्यात येत होती. चाहत्यांना रिलीज डेट ओळखण्याचा टास्क दिलेला असताना दुसरीकडे प्राईमने आज तारीखच जाहीर केली.

नक्की वाचा :  मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार

‘मिर्झापूर सीझन ३’ मध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी दिसणार संघर्ष (Mirzapur Season 3 Release)

प्राईम व्हिडीओने एक कॅप्शन लिहित पोस्टर रिलीज केले आहे. ‘कर दिए है प्रबंधन मिर्झापूर-3 का’ अशी कॅप्शन पोस्टरसह देण्यात आली. मात्र ‘मिर्झापूर सीझन ३’ मध्ये  यावेळी मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा दिव्येंदू शर्मा दिसणार नाही. मागील सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुड्डू भैया आणि गोलू मिळून मुन्ना भैय्याला चकमकीत ठार करतात आणि सूड उगवतात. तर शरद शुक्ला कालीन भैय्याला वाचवण्यात यशस्वी होतो.  या सीझनमध्येही मिर्झापूरच्या सत्तेच्या खुर्चीसाठी संघर्ष सुरू राहणार आहे. ही खुर्ची कोणाला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अवश्य वाचा : भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी दमदार विजय

एक्सेल एंटरटेन्मेंटचे निर्माते रितेश सिधवानी यांनी म्हटले की, “मिर्झापूरच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचे कौतुक केले. आता पुन्हा एकदा प्रेक्षक मिर्झापूरमध्ये पोहचणार आहेत. प्रेक्षकांना हा सीझन आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ५ जुलैपासून ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here