Missing : नगर : हरविलेल्या व अपहरण (Kidnapping) केलेल्या बालकांच्या व बेपत्ता (Missing) पुरूष, महिलांच्या संदर्भात ‘ऑपरेशन मुस्कान- 13’ (Operation Muskan) ही विशेष शोधमोहीम ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत या कालावधीत राबविली जाणार आहे. याचदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील हरविलेले व पळविलेले बालके तसेच बेपत्ता महिला व पुरूषांचा शोध सुरू केला आहे.
नक्की वाचा : ‘विरोधकांना मी पुन्हा माफ केले हाच माझा बदला’- देवेंद्र फडणवीस
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षामार्फत मोहिम
राज्यभरात ‘ऑपरेशन मुस्कान- 13’ ही मोहिम सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यात देखील पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षामार्फत ही मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पथक हे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना भेट देऊन सदर मोहिमेबाबत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना समक्ष भेटून संबंधित मोहिमेबाबत माहिती देणार आहेत.
अवश्य वाचा : नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरू करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी
मुले, बेपत्ता महिला व पुरूष यांचा प्रभावीपणे शोध घेणार (Missing)
तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे आपल्या पोलीस ठाणे स्तरावर या मोहिमेसाठी एक अधिकारी व तीन पोलीस अंमलदार असे पथक तयार करून त्यांच्याकडून ‘ऑपरेशन मुस्कान- 13’ व्दारे हरविलेले व पळविलेले अल्पवयीन मुले- मुली तसेच रेकॉर्ड व्यतिरिक्त रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळ, रूग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले, बेपत्ता महिला व पुरूष यांचा प्रभावीपणे शोध घेतला जाणार आहे.