Mission Aarambh Exam : कोळगावच्या शाळेचा शैक्षणिक पाया मजबूत : कुसुमकुमारी कानडी

Mission Aarambh Exam : कोळगावच्या शाळेचा शैक्षणिक पाया मजबूत : कुसुमकुमारी कानडी

0
Mission Aarambh Exam : कोळगावच्या शाळेचा शैक्षणिक पाया मजबूत; कानडी यांच्याकडून गुणवत्तेचे कौतुक
Mission Aarambh Exam : कोळगावच्या शाळेचा शैक्षणिक पाया मजबूत; कानडी यांच्याकडून गुणवत्तेचे कौतुक

Mission Aarambh Exam : श्रीगोंदा : ‘मिशन आरंभ’ परीक्षेत (Mission Aarambh Exam) चौथीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या सामूहिक कष्टाचे फळ आहे,” “कोळगाव जिल्हा परिषद शाळेने (Zilla Parishad School) प्रशासकीय शिस्तीसोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर जो भर दिला आहे, तो कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी (Kusumkumari Kanadi) यांनी केले आहे. 

नक्की वाचा : पोलीस-विद्यार्थी संवादातून सुरक्षिततेचा संदेश; जनजागृती कार्यक्रम उत्साहात

शाळेची वार्षिक शैक्षणिक तपासणी

कुसुमकुमारी कानडी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली शाळेची वार्षिक शैक्षणिक तपासणी झाली. शाळेच्या वार्षिक तपासणीप्रसंगी त्या बोलत होत्या.तपासणी प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने शालेय दप्तर तपासणी, विद्यार्थी आधार नोंदणी, शालेय पोषण आहार योजना आणि विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष गुणवत्ता या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

अवश्य वाचा : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच

‘मिशन आरंभ’ परीक्षेत शाळेचा ६५% निकाल (Mission Aarambh Exam)

यावेळी चौथीच्या ‘मिशन आरंभ’ परीक्षेत शाळेचा एकूण निकाल ६५% लागला आहे. विशेष प्राविण्य मिळवलेल्या प्रतीक विकास लगड, साईराज अर्जुन भोसले, शिवम राजकुमार गुप्ता, पार्थ अक्षय ढगे, अभिमन्यू नितीन लगड, रिया कृष्णा थोरात, शंतनु संजय शेलोत, आयुष्य देविदास सपाटे, रिया योगेश चंदन, आदिराज माधव नलगे या दहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याने गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला आर्थिक देणगी

शाळेच्या सौंदर्यीकरणासाठी आणि प्रेरणादायी ‘शिवचरित्र’ रंगकामासाठी १९९६ च्या चौथी उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत आर्थिक देणगी देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. या देणगीदारांच्या दातृत्वाचा यावेळी विशेष नामोल्लेख करून गौरव करण्यात आला. “जेव्हा माजी विद्यार्थी आपल्या शाळेची नाळ जपतात, तेव्हा त्या शाळेचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही,” अशा शब्दांत कानडी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

शाळेच्या प्रगतीसाठी समिती, शिक्षक आणि ग्रामस्थ सदैव कटिबद्ध

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित लगड व उपाध्यक्ष बाळासाहेब लगड यांनी उपस्थितांचे आभार मानताना त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी समिती, शिक्षक आणि ग्रामस्थ सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. या तपासणी कामी केंद्रप्रमुख दत्तात्रय कडूस, केंद्रप्रमुख हराळ, ज्येष्ठ मुख्याध्यापिका नलगे, ज्येष्ठ शिक्षक नारायण जठार आणि श्रीमती आरती लगड यांनी उपस्थित राहून विविध विभागांची पाहणी केली. शाळेचे अद्ययावत दप्तर आणि नियोजनाबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.