Mizoram Stone Mine Accident : मिझोराममध्ये खाण कोसळून दहा जणांचा मृत्यू 

मिझोराममध्ये आज रेमल चक्रीवादळामुळे पाऊस झाल्याने दगडाची खाण कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

0
Mizoram Stone Mine Accident
Mizoram Stone Mine Accident

नगर : मिझोराममध्ये आज (ता.२८) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी रेमल चक्रीवादळामुळे (Remal Cyclone)तत पाऊस झाल्याने दगडाची खाण कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू (Ten People Died) झाला आहे. तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती मिळत आहे. पावसादरम्यान ढिगाऱ्याखालून काही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. खाण कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती समोर आल्यानंतर तातडीने पोलीस आणि रेस्क्यूसाठी आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल झाली.

नक्की वाचा :  मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल  

बचाव मोहिमेत दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश (Mizoram Stone Mine Accident)

मिझोराममधील एका दगडी खाणीत झालेल्या भीषण अपघातानंतर सुरू करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. अनेक मजूर अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून, त्यांना वाचवण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. ही दुर्घटना मिझोरामची राजधानी आयझॉलमध्ये झाला आहे. रेमल चक्रीवादळामुळे येथे याअगोदर देखील मोठ्या प्रमाणात विध्वंस पाहायला मिळाला आहे.आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आयझॉलच्या मेल्थम सीमेवर दगडाची खाण कोसळली. खाण कोसळल्यामुळे आजूबाजूची अनेक घरे देखील उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे.

अवश्य वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेमल चक्रीवादळाचा दणका; एक लाख नागरिकांचे स्थलांतर 

दोन वर्षांपूर्वी मिझोराममध्ये घडली होती दुर्घटना (Mizoram Stone Mine Accident)

दोन वर्षांपूर्वी मिझोराममध्ये अशीच दुर्घटना घडली होती. राज्यातील हनथियाल जिल्ह्यात १६ नोव्हेंबर २०२२ रोजी दगडाची खाण कोसळली होती. खाण सुरू असताना अनेक मोठे दगड वरून फुटून कामगारांवर पडले, त्यामुळे १२ कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले.त्यानंतर आता पुन्हा ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here