Gopichand Padalkar: लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका. ‘जसा बाप तशीच लेक’ असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला. शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या असल्याची जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.
नक्की वाचा : कांदा दरवाढीनंतर केंद्रसरकारचा मोठा निर्णय,सरकार ‘या’ दरानं विकणार कांदा
‘सुप्रिया सुळे त्यांच्यातली ‘किडकी बहिण’ महाराष्ट्राला दाखवत आहेत’ (Gopichand Padalkar)
सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू नका असं बोलतात. अजित पवार तिकडं लाडकी बहिण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत. मात्र इथं सुप्रिया सुळे त्यांच्यातली ‘किडकी बहिण’ महाराष्ट्राला दाखवत असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. मनोज जरांगे पाटील, एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे तिघही मराठा आहेत. म्हणून जरांगे शिंदेंबद्दल बोलायच नाही असं सुप्रिया सुळे बोलल्या असल्याचे पडळकर यांनी सांगीतले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. कारण, मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन इथं महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पडळकर म्हणाले.
अवश्य वाचा : अभिनेता गश्मीर महाजनी व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्रींच्या भूमिकेत दिसणार