MLA Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांचे दोन शिलेदार बिनविरोध नगरसेवक

MLA Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांचे दोन शिलेदार बिनविरोध नगरसेवक

0
MLA Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांचे दोन शिलेदार बिनविरोध नगरसेवक
MLA Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांचे दोन शिलेदार बिनविरोध नगरसेवक

MLA Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे (Nationalist Congress Party (Ajit Pawar faction)) उमेदवार कुमार वाकळे (Kumarsinh Wakale)प्रकाश भागानगरे (Prakash Bhagangare) हे निवडणुकीपूर्वीच नगरसेवक (Corporator) झाले आहेत. या शिवाय काही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. नगरसेवक झालेले दोन्ही शिलेदार आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांचे निष्ठावान समजले जातात.

MLA Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांचे दोन शिलेदार बिनविरोध नगरसेवक
MLA Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांचे दोन शिलेदार बिनविरोध नगरसेवक

नक्की वाचा : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेचा मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडून आढावा

या उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील मोठी घटना आज (ता. १) घडली आहे. प्रभाग १०मधील स्नेहा श्रीपाद छिंदम यांनी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्या जगदंबा विकास आघाडीकडून निवडणूक लढत होत्या. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत केडगाव कार्यालयात ८ उमेदवारांनी आज (ता. १) माघार घेतली. यात प्रभाग १५ अ मधून नम्रता गव्हाणे, क मधून साक्षी खैरे, ड मधून गणेश पोळ, शीला शिंदे, प्रभाग १७ क मधून प्रतिभा कोतकर, पुनम घेंबुड, प्रभाग १६ ड मधून सुजित काकडे, क मधून हर्षद कराळे यांचा समावेश आहे. प्रभाग १० ड मध्ये रुद्रेश भाऊसाहेब अंबाडे व स्वाती सागर मुर्तंडकर या दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

MLA Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांचे दोन शिलेदार बिनविरोध नगरसेवक
MLA Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांचे दोन शिलेदार बिनविरोध नगरसेवक

अवश्य वाचा: युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व शहरप्रमुख महेश लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी

अजित पवार गटाने मिळविली दोन नगरसेवकपदे (MLA Sangram Jagtap)

प्रभाग क्रमांक ८ ड मध्ये कुमार वाकळे बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खाते उघडले आहे. प्रभाग १४मधील माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा दुसराही उमेदवार बिनविरोध ठरला. त्यामुळे अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी अजित पवार गटाने खाते उघडत दोन नगरसेवकपदे मिळविली आहेत.