MLA Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) युतीच्या (भाजप व राष्ट्रवादी) (BJP and NCP) उमेदवारांचा झंझावाती प्रचार सुरू झाला आहे. सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये युतीच्या सुशिक्षित, सुसंस्कृत, विकासाचे व्हिजन असलेले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये ऋग्वेद गंधे (Rugved Gandhe) यांच्या जाहीर प्रचाराचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या हस्ते करण्यात आला.
अवश्य वाचा: पोस्टल बॅलेटसाठी १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट; यशवंत डांगे
युतीच्या चारही उमेदवारांचा प्रभागात माेठा जनसंपर्क
यावेळी उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. युतीच्या चारही उमेदवारांचा प्रभाग तीनमध्ये पूर्वीपासून दांडगा जनसंपर्क आहे. युतीला मानणारा मोठा वर्ग या प्रभागात आहे. त्यामुळेच धडाडीने विकासकामे करण्याची हातोटी असलेले उमेदवार हातात कमळ व घड्याळ घेवून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक तीन हा सावेडी उपनगराची सांस्कृतिक ओळख आहे. या प्रभागात विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून भरीव विकासकामे करण्याची ग्वाही देत उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे.

अवश्य वाचा : ले ग्रँड रेक्समध्ये एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (MLA Sangram Jagtap)
उमेदवारांच्या विकासाच्या व्हिजनला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागात मजबूत अंतर्गत रस्त्यांचे जाळे, सांडपाणी व्यवस्थापन, मुबलक पाणी- पुरवठा, पथदिवे, ओपन स्पेसचा विकास, ओपन जीम, उद्याने, मनपा मार्फत अद्ययावत आरोग्य सुविधा, अशी विविध विकासकामांची ग्वाही गंधे यांनी दिली आहे. यावेळी महेंद्र गंधे, अजिंक्य बोरकर, मल्हार गंधे, हर्षल बांगर, अभि वराळे, शशांक महाले, ज्योती गाडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



