Narhari Zirwal:मोठी बातमी!नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या

0
Narhari Zirwal:मोठी बातमी!नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या
Narhari Zirwal:मोठी बातमी!नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या

Narhari Zirwal : आता मंत्रालयातून (Ministry) एक मोठी बातमी समोर येत आहे. आदिवासी आरक्षणात (Adivasi Reservation) इतर कोणत्याही जातीच्या समावेश करू नये,अशी मागणी करत विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून जाळीवर उड्या (Jump Up) मारल्या आहेत. त्यामुळे मंत्रालयात मोठा गोंधळ उडाला होता.

नक्की वाचा : ठरलं तर मग!हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार    

मुख्यमंत्री न भेटल्याने आमदारांचा संताप अनावर (Narhari Zirwal)

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या. अशात राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यास विरोध केला आहे. दोन दिवसांपूर्वी हे सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. अनेक तास वाट पाहिल्यानंतरही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेट घेतली नसल्याने हे सर्व आमदार संतापले होते.

अवश्य वाचा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

नरहरी झिरवळ यांचा रक्तदाब वाढला (Narhari Zirwal)

दरम्यान या सर्व आमदारांना जाळीतून बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी नरहरी झिरवळ यांचा रक्तदाब वाढला होता. अशा अवस्थेतही झिरवळ आणि सर्व आदिवासी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आग्रही आहेत. मंत्रालयात अनेक आदिवासी आमदार दुसऱ्या मजल्यावरील सुरक्षा कठड्यावर उतरून घोषणा देत होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये, अशी मागणी या आंदोलक आमदारांनी केली आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंत्रालयातील पोलिसांनी धाव घेत आंदोलनकर्त्या आमदारांना जाळीतून बाहेर काढले. उड्या मारलेल्या आमदारांपैकी कोणीही जखमी झालेले नाही. मंत्रालयात यापूर्वीही अनेक सर्वसामान्य नागरिकांनी कामे होत नसल्याने वैतागून उड्या मारल्याचे पाहायला मिळाले आहे.मात्र आता आमदारही असेच प्रकार करत असल्याने चिंता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here