MLC Election:विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर

0
MLC Election:विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर
MLC Election:विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर

नगर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Legislative Council) पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार (Grand Alliance candidate) जाहीर झाले आहेत. विधानपरिषदेच्या पाचपैकी तीन जागांसाठी भाजपनं (Bhartiy Janata party) काल (ता.१७) उमेदवार जाहीर केले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)आणि शिवसेनेनं (Shivsena) उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेनं चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या पाच जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा : दूध दरात दोन रुपयांनी वाढ;’या’दिवशीपासून लागू होणार नवे दर

रिक्त जागांसाठी विधान परिषद निवडणुक कार्यक्रम जाहीर (MLC Election)

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं त्या जागा रिक्त झाल्या होत्या. शिवसेनेचे आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे निवडणुकीत विजयी झाल्यानं त्यांचं विधान परिषदेतील सदस्यत्व संपुष्टात आलं होतं. या रिक्त जागांसाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.

अवश्य वाचा : अक्षर पटेल आता दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार!
विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या (ता. १८) ला अर्जांची छाननी होईल. त्यानंतर २० मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर, मतदानाची तारीख २७ मार्च आहे. मात्र,पाचपेक्षा अधिक अर्ज आले नाहीत तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

‘विरोधी पक्षाकडून उमदेवार नाही’ (MLC Election)

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असली तरी विरोधी पक्षांनी मात्र उमेदवार देण्याचं धाडस दाखवलेलं नाही. याचं कारण विधानसभेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळं उमेदवार दिला तरी यश मिळणार नसल्याची खात्री असल्यानं महाविकास आघाडीनं या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here