MNREGA Rename: मोदी सरकारनं ‘मनरेगा’चं नाव बदललं;नवीन नाव काय ?  

0
MNREGA Rename: मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं;नवीन नाव काय ?  
MNREGA Rename: मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं;नवीन नाव काय ?  

MNREGA Rename: केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet Meeting) काल १२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत ग्रामीण रोजगाराबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच मनरेगाचे (MNREGA) नाव बदलण्यात (Rename) आले आहे. या योजनेचा नाव आता पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना (Pujya Bapu Rural Employment Scheme) असे करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत कामाच्या दिवसांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने किमान वेतनातही सुधारणा केली आहे. आता यात काय बदल झालेत ते पाहू…

नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेत १६५ कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटले;मंत्री आदिती तटकरेंनी दिली कबुली

योजनेचा उद्देश नेमका काय ? (MNREGA Rename)

मनरेगा ही यूपीए-१ सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक असून, २००५ मध्ये सुरू करण्यात आली होती. ग्रामीण भागातील कुटुंबांना उपजीविकेची सुरक्षा पुरवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या या योजनेत १५ कोटींहून अधिक लोक सक्रियपणे काम करत आहेत, यात सुमारे एक-तृतीयांश महिलांचा समावेश आहे. सुरुवातीला या योजनेचे नाव राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे होते, त्यानंतर २००९ मध्ये या योजनेचे नाव बदलून ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ असे करण्यात आले होते. आता या महत्त्वपूर्ण योजनेला ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ म्हणून ओळखले जाईल आणि या योजनेत १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी मिळेल.

अवश्य वाचा:  कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा

मनरेगा अंतर्गत कोणती कामे होतात ? (MNREGA Rename)

आता मोदी सरकारने या योजनेचे फक्त नावच बदलले नाही, तर या योजनेच्या लाभातही वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कामाच्या दिवसांची संख्या आता १०० वरून वाढवून १२५ दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला एका आर्थिक वर्षात १०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. तसंच मानधनातही वाढ करण्यात आली असून ते आता २४० रुपये दिवसाला इतकं असणार आहे. मनरेगा अंतर्गत दिले जाणारे काम बहुतेक श्रम-केंद्रित असते. यामध्ये रस्ते बांधकाम, जलसंधारण उपक्रम, तलाव खोदकाम, बागकाम आणि गावांमध्ये सामुदायिक विकासाशी संबंधित विविध लहान-मोठे प्रकल्प समाविष्ट आहेत.