MNS : हिवरगाव पावसा टोल नाक्यावर मनसेचा राडा

MNS : हिवरगाव पावसा टोल नाक्यावर मनसेचा राडा

0
MNS

MNS : संगमनेर : स्थानिक वाहन धारकांकडून किमान ५० टक्के टोल आकारणी करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांसह अनेक संघटनांनी विरोध केला होता. मात्र, टोल प्रशासन (Toll Administration) स्थानिकांकडून टोल आकारणी बाबत ठाम असल्याने मनसे (MNS) सैनिकांनी शुक्रवारी (ता.१५) दुपारी टोल नाक्यावर लावलेले बॅनर फाडून निषेध (Prohibition) व्यक्त केला.

नक्की वाचा: मी लोकसभा निवडणूक लढवावी ही जनमाणसाची भावना – नीलेश लंके

स्थानिकांकडून टोल वसुलीसाठी लावलेले बॅनर फाडले (MNS)


मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनाने स्थानिकांकडून टोल वसुलीसाठी लावलेले बॅनर फाडले. तसेच स्थानिकाकडून वसुली केली तर गाठ मनसेशी राहिल असे सांगण्यात आले. यानंतर लगेच टोल प्रशासन व मनसे कार्यकर्त्यांनी सर्व बॅनर हटवले. नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर (एन एच ६० ) संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाका सुरु झाल्यापासून, अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यात प्रमुख्याने टोल प्रशासनाने रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष, बंद असलेले विजेचे पथदिवे, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गावातील प्रवेशासाठी केलेले अर्धवट सर्व्हिस रोड आदींसह महामार्गाच्या निर्मीतीच्या वेळी तोडलेल्या झाडांच्या प्रकरणांचा समावेश आहे. या परिसरातील सुमारे २० किलोमीटर अंतरावरील शेतकरी, नोकरदार व इतर नागरिकांना दररोज अनेकदा तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. अनेकदा टोलनाका ओलांडावा लागत असल्याने, अनेक वेळा स्थानिकांची अडवणूक केल्याने टोल भरण्यावरुन वादाचे व त्यामुळे राजकीय संघटनांसह स्थानिकांनी केलेल्या आंदोलनांचे प्रसंगही उद्भवले आहेत. टोलनाक्यावरील फास्टॅग स्कॅनरमुळे स्थानिकांच्या बँक खात्यातून टोलचे पैसे कट होत असल्याचा अनुभवही अनेकांना आला आहे.

MNS

हे देखील वाचा :लोकसभा निवडणुकीची उद्या आचार संहिता जाहीर होणार

तूर्तास स्थानिकांना टोलपासून दिलासा (MNS)


या पार्श्वभुमीवर टोल प्रशासनाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या नियमानुसार नवीन नियमावली आणली आहे. त्यानुसार स्थानिकांकडून मासिक ३३० रुपयाचा पास आकारला जाणार असल्याचे फर्मान टोल नाका प्रशासनाने काढल्यानंतर शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने त्यांना समजावले असून तूर्तास स्थानिकांना टोलपासून दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here