MNS : नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे (BJP) विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (MNS) पदाधिकारी नितीन भुतारे हे टीकाटिप्पणी करत होते. विखे यांच्या विरोधात त्यांनी एक स्पर्धा ही आयोजित केली होती. ही बाब मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार भुतारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा आहे.
नक्की वाचा: महत्त्वाची बातमी! नगरसह अनेक रस्त्यांच्या वाहतुकीत बदल; असा असेल बदल
राज्यातील राजकीय समीकरणात बदल
राज्यातील राजकीय समीकरणात मनसे भाजपशी जुळवून घेत आहे अशावेळी मनसे पदाधिकाऱ्याकडून भाजप उमेदवाराच्या विरोधातच काम सुरू असल्यामुळे ही कारवाई झाल्याचे समजते.
हे देखील वाचा: अण्णा हजारे यांना पहिलं जागं करा; संजय राऊत यांचा खाेचक सवाल
बाळा नांदगावकर यांच्या सूचनेनुसार पदमुक्त (MNS)
मनसेकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने बाळा नांदगावकर यांच्या सूचनेनुसार नितीन भुतारे यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आपल्याला मनसे जिल्हा सचिव या पदावरून पदमुक्त करण्यात येत आहे. याबाबतचा आदेश नगर मनसेचे अध्यक्ष सचिन डफळ यांनी दिला आहे, असे आदेशात म्हटले आहे.
स्पर्धा मनसेची जिंकले विखे
मनसेचे पदाधिकारी भुतारे यांनी काही दिवसांपूर्वी नगर शहरात एका स्पर्धेचे आयोजन केले होते. सुजय विखे यांनी सर्वसामान्य नागरिकांना लाभलेले एक फोन रेकॉर्डिंग दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा अशी स्पर्धा भुतारे यांनी भरवली होती मात्र ही स्पर्धा त्यांच्याच अंगलट आली असून थेट मनसे मधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.