MNS : अहिल्यानगर : पवईतील एल अँड टी (L&T) च्या सुरक्षा रक्षकाची एका मराठी व्यक्तीसोबत काही कारणामुळे वाद झाला होता. यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. मात्र हा सुरक्षा रक्षक उत्तरेकडील असल्यामुळे त्याला मराठी (Marathi) बोलता येत नव्हते. याशिवाय मराठी येत नसल्याचे छातीठोकपणे तो सुरक्षा रक्षक सांगत होता. ‘मराठी गया तेल लगाने’, असे देखील या सुरक्षा रक्षकाने म्हटले. या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी (MNS) चांगलीच अद्दल घडवली.
नक्की वाचा : बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण;सुरेश धस यांचा दावा!
मराठी येत नसेल तर ती भाषा शिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसैनिकांना पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन केले होते. या मेळाव्यात संबोधित करतांना बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का? हे बघा नसेल तर त्यांना करायला लावा, असा संदेश दिला होता. ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक देत बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणे अनिवार्य असल्याची मागणी केली आहे. तर “मराठी गया तेल लगाने”, असे म्हणणाऱ्या मुजोर सुरक्षारक्षकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलमध्ये समाज दिली आहे. मराठी येत नसेल तर शिकायला हवं आणि हे शांतपणे बोलायला हवं. ‘मराठी गया तेल लगाने’ असं म्हणत मराठी भाषेचा अपमान करणं योग्य नसल्याचं मनसैनिकांनी यावेळी सांगितलं. मराठी येत नसेल तर ती भाषा शिका. मात्र त्याचा अवमान करणाऱ्याला सोडणार नाही, असंही मनसैनिकांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा : तिसऱ्या दिवशी ७०, ७९ आणि ९२ किलो वजनी गटातील मल्लांनी गाजवले मैदान
या घटनेबाबत मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, (MNS)
आज काही बँका बंद आहेत, उद्यापासून पुन्हा सरकारी आणि खाजगी बँकांना निवेदन देणार आहे. स्टाफ देखील मराठी माणसं असली पाहिजेत. बोलणारी माणसे देखील मराठीच असली पाहिजेत. बदल दिसला नाही तर मनसेला सामोरे जावे लागणार आहे. मराठीत कारभार झाला नाही तर बँकेत सर्व बॅनर्स आम्ही स्वखर्चाने लावणार आहोत. मराठी व्यवहार झाला नाही आणि बॅनर जर लावले नाही तर फुकट मार खाल. मराठी माणसाबाबत मराठीचा खरंच अपमान होत असेल तर आमची लाथ आणि हात दोन्ही गोष्टी पडतील. पुढच्या आठ दिवसात ठाणे जिल्ह्यातील सर्व बँकात आमचे निवेदन जाणार आहे. आम्हाला बदल हवाय, असे त्यांनी यावेळी म्हटले.