MNS : गणेश मूर्तींचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी; मनसेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

MNS : गणेश मूर्तींचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी; मनसेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

0
MNS : गणेश मूर्तींचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी; मनसेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
MNS : गणेश मूर्तींचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी; मनसेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

MNS : नगर : पुढील महिन्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात (Ganeshotsav) गणेश मूर्तींचे विद्रुपीकरण व विटंबना होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. काही मूर्तिकार (Sculptors) व सार्वजनिक गणेश मंडळामूळ रूपातील गणपती सोडून काल्पनिक रूपातील गणेश मूर्ती स्थापन करत असतात. अशा काल्पनिक रूपातील गणेश मूर्तीं मुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे गणेश मूर्तींचे विद्रुपीकरण करणाऱ्यां मंडळांवर व मूर्तिकारांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा (Sumit Verma) यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

नक्की वाचा : धुळ्यात राडा;माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

मंडळावर सक्तीच्या कारवाईची मागणी

यावेळी प्रवीण गायकवाड, आयुश नागरे, ऋषिकेश थोरात, अर्जून दळवी, अद्वैत पारगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे. यावर्षी पासून गणेशोत्सव दरम्यान गणपती मंडळांनी जर मूळ रूपातील गणपती सोडून काल्पनिक रूपातील गणेश मूर्ती स्थापन केल्यास हिंदू धर्म देवी देवतांच्या विटंबना म्हणून त्या गणेश मंडळावर सक्तीची कारवाई करावी.

अवश्य वाचा : कर्जत तालुका प्रशासनाने राशीन प्रकरणात सर्वसमावेशक तोडगा काढला

मूर्तिकारांकडून काल्पनिक बदल (MNS)

भगवान शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लाऊन दिलेले रूप मूळ रूप आहे. पण काही मूर्तिकार कधी बाहुबली तर कधी कोणत्या कलाकाराचं तर कधी विविध गोष्टी, घटना किंवा डॉक्टर, पोलीस, राजकीय नेते यांच्या रूपातील गणेश मुर्त्यांची स्थापना केली जाते. हे चुकीचे आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.