Mobile Laboratory : अकोले: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा, त्यांनी संशोधनाकडे वळावे विज्ञानाविषयी (Science) असलेलं कुतूहल, जिज्ञासा समजून घेता यावे. उच्च शिक्षण ते प्राथमिक शिक्षण यांच्यात दुवा साधला जावा, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) व एलजी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिरत्या प्रयोगशाळा’ (Mobile Laboratory) ग्रामीण भागात गावोगावच्या शाळांमध्ये जाऊन प्रबोधन करत आहे. जिल्हा परिषदेच्या मांडेवाडी (ता. अकोले) शाळेत आज फिरती प्रयोगशाळा दाखल झाली. प्रयोगशाळेतील साहित्य पाहून मुले हरखून गेली.
अवश्य वाचा: चिंता करू नका, नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेणार: विखे पाटील
विद्यार्थ्यांसमाेर वैज्ञानिक प्रयोग सादर
द्रवरूप नायट्रोजनचे सजीव व निर्जीव वस्तूंवर होणारे परिणाम, लेविटेशन ट्रेन, सौर ऊर्जेवर चालणारी बोट, सॉल्ट वॉटर बॅटरी, फ्लॅश लाईट यासारखे वैज्ञानिक प्रयोग विद्यापीठ प्रतिनिधींनी सादर केले. विद्यार्थ्यांनी स्वतः जोडणी करून प्रयोगांमागील वैज्ञानिक तत्त्व समजून घेतले.
नक्की वाचा : प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी; आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार
नवनव्या गोष्टी मुलांना या प्रयोगशाळेतून माहित (Mobile Laboratory)
पाण्याचा गोठणांक उत्कलनांक किती असतो? वैज्ञानिक उपकरणे कशी काम करतात? अशा अनेक नवनव्या गोष्टी मुलांना या प्रयोगशाळेतून माहित झाल्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून जो विद्यार्थी प्रयोगात सहभागी होईल, प्रश्नाचे उत्तर देईल त्याला वैज्ञानिक पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. प्रयोगशाळेतील प्रयोगाचे सादरीकरण निशांत जगताप, सोमनाथ मुर्तडक, राहुल जगताप, रवी शेरकर, अशोक पिराने यांनी केले.



