Mock Drill:देशातल्या कोणत्या जिल्ह्यात होणार मॉकड्रील,त्यात महाराष्ट्र आहे का ?

0
Mock Drill:देशातल्या कोणत्या जिल्ह्यात होणार मॉकड्रील,त्यात महाराष्ट्र आहे का ?
Mock Drill:देशातल्या कोणत्या जिल्ह्यात होणार मॉकड्रील,त्यात महाराष्ट्र आहे का ?

Mock Drill : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) पाकिस्तानसोबत (Pakistan) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मॉकड्रिल (Mock Drill) करण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, उद्या ७ मे रोजी ही मॉकड्रील होणार आहे. या दरम्यान नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा,ते ट्रेनिंग दिलं जाईल. नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणं हा या मॉक ड्रिल मागे उद्देश आहे. देशात शेवटची मॉक ड्रील १९७१ साली झाली होती.

नक्की वाचा : बारावीचा निकाल जाहीर;यंदाही मुलींनीच मारली बाजी,राज्याचा निकाल ९१.८८ टक्के  

ही मॉक ड्रील २४४ सिव्हिल डिफेंस डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे.सिव्हिल डिफेंस कायदा १९६८ संपूर्ण देशात लागू आहे.भारत आणि पाकिस्तान सीमेशी जोडलेल्या २४४ जिल्ह्यात मॉक ड्रिलची योजना आहे. हे जिल्हे भारत-पाकिस्तान सीमेशी जोडलेले आहेत. यात जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाबसारख्या राज्यातील जिल्हे येतात. या राज्यांच्या सीमा पाकिस्तानला लागून आहेत. त्या शिवाय अशीही काही संवेदनशील शहरं आहेत, ज्यांना सिव्हिल डिफेंस डिस्ट्रिक्टमध्ये परावर्तित करण्यात आलं आहे.

अवश्य वाचा : संतोष देशमुखांच्या लेकीचं बारावीच्या परीक्षेत यश;वैभवी देशमुखला किती टक्के?  

नागरी सुरक्षेचा उद्देश जीवन वाचवणं, संपत्तीची हानी कमी करणं, उत्पादन कायम सुरु ठेवणं आणि लोकांच मनोबल कायम ठेवणं हा आहे. युद्ध आणि आपत्कालीन परिस्थितीच्यावेळी सिव्हिल  डिफेंस ऑर्गनायजेशनची भूमिका महत्त्वपूर्ण असते. यात ते आंतरिक क्षेत्रांच रक्षण करतात. सशस्त्र यंत्रणांना मदत करतात. नागरिकांना संघटित करतात.

सायरन वाजल्यावर काय करालं? (Mock Drill)

तात्काळ सुरक्षित आश्रय स्थळी जा.

५ ते १० मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा.

सायरन वाजल्यानंतर घाबरुन जाऊ नका.

फक्त मोकळ्या जागेपासून लांब रहा.

घरात आणि सुरक्षित इमारतींच्या आत प्रवेश करा.

टीव्ही, रेडियो, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.

अफवावर विश्वास ठेऊ नका, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

सायरन कुठे-कुठे लागणार ? (Mock Drill)

सरकारी भवन

प्रशासनिक भवन

पोलीस मुख्यालय

फायर स्टेशन

सैन्य ठिकाण

शहरातील मोठे बाजार

गर्दीच्या जागा

सिव्हिल मॉक ड्रिल मध्ये कोण-कोण?

जिल्हाधिकारी

स्थानीय प्रशासन

सिविल डिफेंस वार्डन

पोलिसकर्मी

होम गार्ड्स

कॉलेज-स्कूल विद्यार्थी

नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC)

नॅशनल सर्विस स्कीम (NSS)

नेहरू युवा केंद्र संगठन (NYKS)