Medicine Rate : मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘ही’औषधे होणार स्वस्त

केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. NPPA म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत निश्चित केली आहे.

0
Medicine Rate
Medicine Rate

नगर : भारतात सध्या वैद्यकीय उपचार घेणे खूप महाग होत चालले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने ६९ नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत निश्चित केली आहे. यानंतर कोलेस्टेरॉल, साखर, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, लहान मुलांची अँटिबायोटिक्स यासह १०० औषधे स्वस्त होऊन लोकांचा आरोग्य सेवेवरचा खर्च कमी होणार आहे.

नक्की वाचा : कापड कारखान्यातील व्यवस्थापकाला लुटणारे जेरबंद; १० लाख रुपये हस्तगत

औषधांच्या नवीन पॅकिंगवर सुधारित दर (Medicine Rate)

सरकारी अधिसूचनेनुसार नवीन पॅकिंगवर सुधारित दर असतील. त्याचवेळी औषधांच्या डीलर नेटवर्कला देखील नवीन किंमतींची माहिती द्यावी लागेल. देशात कोरोना महामारीनंतर औषधांच्या किंमती आणि वैद्यकीय खर्चात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने फेब्रुवारीच्या सुरुवातीला औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत महिनाभरात दुसऱ्यांदा औषधांच्या किंमतीत कपात केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अवश्य वाचा : श्रीरामपुरात गावठी कट्टा, तलवार घेऊन फिरणारे दोघे पकडले

आदेशाची अंमलबजावणी कशी होणार ? (Medicine Rate)

नवीन पॅकिंगवर सुधारित दर लिहिला जाणार आहे. तर डीलर नेटवर्क नवीन किमतींबद्दल माहिती देतील. कंपन्यांनी त्यासाठी पैसे भरले असतील तरच ते निश्चित किंमतीवर जीएसटी वसूल करू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here