Mohatadevi : पाथर्डी : श्रीक्षेत्र मोहटादेवीगड (Mohatadevi) येथे वासंतीक नवरात्रोत्सवाचा (Chaitra Navratri Celebrations) शुभारंभ गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) शुभमुहूर्तावर अत्यंत भक्तिमय वातावरणा करण्यात आला. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने विश्वस्त श्रीकांत लाहोटी यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत पूजा करून नवरात्र महोत्सवाची मंगल सुरुवात झाली.भक्ती, श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधत मोहटादेवीगडावर वासंतीक नवरात्रोत्सवाची उत्साहपूर्ण आणि मंगलमय सुरुवात झाली आहे.
नक्की वाचा : ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल
नवरात्रोत्सवाचा करण्यात आला महासंकल्प
मानवी जीवनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या विकारांचा त्याग करून सद्गुणांची नवी पालवी जीवनात फुलावी, या उदात्त भावनेतून नवरात्रोत्सवाचा महासंकल्प करण्यात आला. शिशिर ऋतूनंतर वृक्षांना जशी नवपालवी फुटते, त्याचप्रमाणे मानवानेही आत्मशुद्धी साधत नवचैतन्याने जीवन समृद्ध करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
धार्मिक विधींना नवरात्रोत्सवाची सुरूवात (Mohatadevi)
या प्रसंगी श्री गणेशपूजन, पुण्याहवाचन, श्री सप्तशती पाठाचा प्रारंभ तसेच श्री मोहटादेवीची षोडशोपचार पूजा व अभिषेक करण्यात आला. नवसंवत्सर प्रारंभानिमित्त पंचांग श्रवणाचा कार्यक्रमही पार पडला. वेदभूषणदेव व वेदभास्करदेव यांनी पौरोहित्य करत धार्मिक विधींना शास्त्रोक्त स्वरूप दिले.
मढी व मायंबा येथील यात्रोत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोहटादेवीगडावर अहोरात्र भाविकांची मोठी गर्दी उसळलेली दिसून आली. मंदिर परिसरात पारंपरिक गुढी उभारण्यात आली असून भाविकांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुलभ दर्शन, महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्नान व्यवस्था तसेच वाहन पार्किंगची चोख सोय करण्यात आली आहे. यात्रेच्या गर्दीतही शिस्तबद्ध आणि सुयोग्य व्यवस्थापनामुळे भाविकांना दिलासा मिळत आहे.या वेळी बांगरवाडी (जि. धाराशिव) येथील प्रतिंद अच्युत बांगर तसेच महिंदा येथील ओम दहिफळे यांच्या वतीने अन्नदान पंगतीचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला.याचबरोबर मोहटादेवी पालखी मार्गावरील सुमारे १०० मीटर काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभही करण्यात आला. या कामामुळे भाविकांच्या सोयीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.कार्यक्रमाला देवस्थानचे विश्वस्त अशोक दहिफळे, बाबासाहेब दहिफळे, शुभम दहिफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, सरपंच मनिषा पालवे, उपसरपंच अविनाश पुंत्र्दे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवस्थानच्या वतीने जगदंबा देवी धामणगाव, श्री कानिफनाथ संजीवन समाधी (मढी), श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी तसेच श्री आदिनाथ वृदेश्वर देवस्थान येथे यात्रोत्सवानिमित्त महावस्त्र अर्पण करून धार्मिक परंपरा जोपासण्यात आल्या.



