Mohta Devi Gad : अमावास्या-नवरात्र उत्सवाचा संगम; मोहटादेवी गड व मढी येथे भाविकांचा महासागर

Mohta Devi Gad : अमावास्या-नवरात्र उत्सवाचा संगम; मोहटादेवी गड व मढी येथे भाविकांचा महासागर

0
Mohta Devi Gad : अमावास्या-नवरात्र उत्सवाचा संगम; मोहटादेवी गड व मढी येथे भाविकांचा महासागर
Mohta Devi Gad : अमावास्या-नवरात्र उत्सवाचा संगम; मोहटादेवी गड व मढी येथे भाविकांचा महासागर

Mohta Devi Gad : पाथर्डी: शारदीय नवरात्रोत्सवाच्या (Shardiya Navratri Festival) पार्श्वभूमीवर मोहटादेवी गडावर (Mohta Devi Gad) भाविकांची तुफान गर्दी झाली, तर सर्वपित्री अमावास्येनिमित्त श्रीक्षेत्र मढी (Shri Kshetra Madhi) येथील कानिफनाथांच्या संजीवन समाधीवर (Kanifnath Sanjivan Samadhi) नाथ भक्तांचा महापूर उसळला. दोन्ही धार्मिक परंपरा एकाच दिवशी जुळून आल्याने पाथर्डी तालुका भक्तीमय वातावरणाने न्हाऊन गेला.

अवश्य वाचा: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार

मशाल पेटवण्यासाठी गडावर प्रचंड गर्दी

मोहटादेवी गडावर घटस्थापनेच्या दोन दिवस आधीपासूनच राज्यभरातून आलेल्या भाविकांची लोंढे उसळले. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, जळगाव, बीड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. भाविकांनी वाजतगाजत मशाल यात्रा काढून देवीच्या दर्शनासाठी गड चढला. रात्रीपासून पहाटेपर्यंत मशाल पेटवण्यासाठी गडावर प्रचंड गर्दी उसळली होती. युवक चप्पल न घालता पायी मशाल घेऊन चालत किंवा धावत जात होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावोगावी नवरात्रोत्सव मंडळांच्या भाविकांनी मोहटादेवी मंदिरातील पवित्र ज्योत आपल्या गावात नेली. नवरात्रकाळात ही ज्योत देवीसमोर अखंड प्रज्वलित ठेवण्याची परंपरा आहे. त्यामुळे गडावर मशाल घेऊन येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Mohta Devi Gad : अमावास्या-नवरात्र उत्सवाचा संगम; मोहटादेवी गड व मढी येथे भाविकांचा महासागर
Mohta Devi Gad : अमावास्या-नवरात्र उत्सवाचा संगम; मोहटादेवी गड व मढी येथे भाविकांचा महासागर

नक्की वाचा : शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर दाखल (Mohta Devi Gad)

वाहनांतून जेवणाचे साहित्य, तेल-तूप नेले जात होते, तर लाऊड स्पीकरवर देवीभक्तीची गाणी घुमत होती. लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर दाखल होतात. ‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहटादेवीबद्दलची हीच श्रद्धा पिढ्यानपिढ्या कायम आहे. तर मढी येथे भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील सर्वपित्री अमावास्येनिमित्त कानिफनाथांच्या संजीवन समाधीवर नाथभक्तांची प्रचंड गर्दी झाली. संजीवन समाधीस्थळी दर्शनासाठी दिवसभर भाविकांचा ओघ सुरू होता. कीर्तन, भजन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांनी गडावर अखंड भक्तीमय वातावरण निर्माण झाले. हजारो नाथभक्त समाधीस्थळी एकरूप झाले. या दोन्ही धार्मिक परंपरा रविवारी एकत्र आल्याने पाथर्डी तालुक्यात भक्तांचा महासागर उसळला. गडावरील गर्दीमुळे शहरातही रहदारीत मोठी वाढ झाली होती.