Mohta Devi Gad : पालेभाज्या-फळांच्या सजावटीने मोहटादेवीचा गाभारा नटला

Mohta Devi Gad : पालेभाज्या-फळांच्या सजावटीने मोहटादेवीचा गाभारा नटला

0
Mohta Devi Gad : पालेभाज्या-फळांच्या सजावटीने मोहटादेवीचा गाभारा नटला
Mohta Devi Gad : पालेभाज्या-फळांच्या सजावटीने मोहटादेवीचा गाभारा नटला

Mohta Devi Gad : पाथर्डी: शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त (Shakambhari Navratri festival) श्रीक्षेत्र मोहटादेवीगड (Mohta Devi Gad) येथे देवीच्या गाभाऱ्याची भव्य आणि आकर्षक सजावट करण्यात आली. मंचर (ता. आंबेगाव) येथील भाविक बाळासाहेब थोरात यांनी देवीला सुमारे २०० किलो वजनाच्या २७ प्रकारच्या पालेभाज्या, रानभाज्या व फळे अर्पण करून गाभाऱ्याची सजावट केली. या अनोख्या व भक्तिभावपूर्ण सजावटीमुळे मोहटादेवीचा (Mohatadevi) मुखवटा अधिक खुलून दिसत असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नक्की वाचा: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?

पारंपारिक उत्साहात व वेदमंत्रांच्या पावन जयघोषात प्रारंभ

मेथी, पालक, बटाटे, कांदा, मुळा, काकडी, गाजर, वाल, चवळी, गवार, मटार, वांगे, टोमॅटो, भेंडी, हिरवी व ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, दुधी भोपळा, शेवगा, कोथिंबीर, शेपू, लसूण, कांदापात, कारले, पुदिना, कढीपत्ता यासह विविध फळांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. शाकंभरी देवीच्या अन्नपूर्णा स्वरूपाचे दर्शन या सजावटीतून भाविकांना घडत आहे. दरम्यान, श्री मोहटादेवी देवस्थानच्या वतीने शांकभरी नवरात्र महोत्सवाचा पारंपारिक उत्साहात व वेदमंत्रांच्या पावन जयघोषात प्रारंभ झाला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असून परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.

अवश्य वाचा: महायुती फिस्कटली; मनसे व शिंदे गटाचा स्वबळाचा मारा

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन (Mohta Devi Gad)

देवस्थानमार्फत मोहटादेवीचे वासंतिक, शारदीय व शांकभरी अशी तीन नवरात्रे पारंपारिक पद्धतीने साजरी केली जातात. शांकभरी नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दररोज त्रिकाल आरती, सुवासिनी पूजन, श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन, अर्जन तसेच अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने या धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होत असून अनेक भक्त विविध प्रकारचे नैवेद्य देवीला अर्पण करत आहेत.