Molestation : नगर : जामखेड येथील रत्नदीप संस्थेचा संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे (Dr. Bhaskar More) (वय 52, रा. जामखेड बस स्थानका मागे, ता. जामखेड) याने एका विद्यार्थिनीचा विनयभंग (Molestation) केला होता. त्याच्यावर जामखेड पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता. तो जागा व मोबाईलचे सीम बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने मोठ्या शिताफीने त्याला पळसदेव, भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील एका उसाच्या फडातून ताब्यात घेतले.
हे देखील वाचा : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये ;अजित पवारांचा इशारा
इंदापूर येथून जेरबंद (Molestation)
जामखेड तालुक्यातील बहुचर्चित रत्नदीप संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याला इंदापूर येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. मागील काही दिवसांपासून या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी संस्था चालकाच्या मनमानी कारभाराविरुद्ध उपोषणाला बसले आहेत. या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी संस्था चालकाला ताब्यात घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक ओला यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेऊन अखेर त्याला जेरबंद केले.
नक्की वाचा : भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटलांना उमेदवारी
आरोपी भास्कर मोरेला अटक करण्यासाठी विद्यार्थिनींचे उपोषण (Molestation)
पीडितेला २० ऑक्टोबर २०२२ रोजी रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचा संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे याने फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिसचे ऍ़न्टी चेंबरमध्ये बोलावून घेतले. तिथे तिचा विनयभंग केला होता. या घटनेबाबत ८ मार्चला जामखेड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थिनींनी आरोपी भास्कर मोरे याला अटक करण्यासाठी जामखेड येथे उपोषणास बसल्या होत्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दोन विशेष पथके तयार केली. या पथकांना भास्कर मोरेला ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पथकाने तांत्रिक विश्लेषण व नातेवाईकांकडे केलेल्या चौकशी केली. दरम्यान पोलीस निरीक्षक आहेर यांना आरोपी मोरे हा पळसदेव, भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे त्याचा नातेवाईक अशोक चव्हाण याचेकडे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार दोन्ही पथके ही आरोपीचा नातेवाईक अशोक चव्हाण यांच्या घरी पोहोचले. तत्पूर्वी आरोपी तेथून बाहेर पडला होता. पथकाने तात्काळ पळसदेव, भिगवण येथील परिसरात आरोपीचा शोध घेतला. तो उसाच्या शेतात लपून बसलेला पथकाला आढळून आला. त्यानुसार पथकाने आरोपी मोरेला ताब्यात घेतले. पथकाने आरोपीला पुढील तपासासाठी जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.