Molestation of a Girl : श्रीरामपूर : शहरातील एका अल्पवयीन मुलीला (Minor Girl) रस्त्यात अडवून तिचा विनयभंग (Molestation of a Girl) केल्याप्रकरणी आरोपी अल्फाज अब्दुल्ला जुनानी ऊर्फ अफ्फान (वय २४, रा. फातिमा हौ. सोसायटी वॉर्ड नं.१, श्रीरामपूर) याला श्रीरामपूर शहर पोलिसांनी (Police) तत्काळ अटक केली आहे.
अवश्य वाचा : माध्यमिक शिक्षक सोसायटीत ‘परिवर्तन’
याबाबत सविस्तर हकीकत अशी की,
आरोपी अल्फाज अब्दुल्ला जुनानी याने एका अल्पवयीन मुलीला अडवून तिचा हात पकडून विनयभंग केल्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीप्रमाणे अल्पवयीन पीडित मुलीची फिर्याद घेऊन सदर तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नक्की वाचा : बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित;विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची घोषणा
गुन्हयाचा तपास २४ तासाच्या आत पुर्ण (Molestation of a Girl)
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी तपासाचे चक्र जलद गतीने फिरवून या दाखल गुन्हयातील आरोपी अल्फाज अब्दुल्ला जुनानी याचा शोध घेऊन त्यास सदर गुन्ह्यात तत्काळ अटक केले. तसेच सदर गुन्हयाच्या अनुषंगाने नियमाप्रमाणे सखोल तपास करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावे प्राप्त करुन सदर गुन्हयाचा तपास २४ तासाच्या आत पुर्ण करुन सदर गुन्हयाचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.