
Molestation of a Woman : नगर : अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरात एका महिलेचा विनयभंग (Molestation of a Woman) करून जीवे मारण्याची धमकी (Death Threat) दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण
महिलेने तोफखाना पोलिसांत दिली फिर्याद
या फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे की, परिसरात राहणाऱ्या गोरक्षनाथ तांदळे यांनी जुन्या वादातून रागाच्या भरात महिलेला शिवीगाळ करत विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिली.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
संशयित आरोपीला अद्याप अटक नाही (Molestation of a Woman)
ही घटना ११ मार्च रोजी घडली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.


