Molestation of a Woman : पाथर्डीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल 

Molestation of a Woman : पाथर्डीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

0
Molestation of a Woman : पाथर्डीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल 
Molestation of a Woman : पाथर्डीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल 

Molestation of a Woman : पाथर्डी : पाथर्डी शहरातील एका १५ वर्षीयमुलीचा विनयभंग (Molestation of a Woman) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी परप्रांतीय कामगार आषिशकुमार बहु मुखिया (वय २१, रा. फुलवरीया, ता. किशनपूर, जि. सुपौल, बिहार ) याच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच

हात-पाय धरून तिचा विनयभंग

पीडित मुलीने पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार (ता. २४) दुपारी सुमारे दोन वाजता ती घराजवळ शौचास गेली असता, तेथे फरशी बसवण्याचे काम करणाऱ्या आशिष कुमार मुखियाने तिला जबरदस्तीने पकडले आणि तिचे हात-पाय धरून तिचा विनयभंग केला. आशिषच्या हातातून सुटका करून ती घरी पळाली आणि आई-वडिलांना घडलेली घटना सांगितली. कुटुंबीयांनी फरशी बसविणाऱ्या ठेकेदाराकडे आरोपीचे नाव व पत्ता विचारला असता, त्याने आरोपीचे नाव सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी आपल्या आई व मामासोबत पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी (Molestation of a Woman)

या घटनेनंतर मनसेचे तालुका प्रमुख संतोष जिरेसाळ आणि जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी संताप व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्याची आणि पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.