Molestation of a young woman : युवतीची छेडछाड; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Molestation of a young woman

0
Molestation of a young woman : युवतीची छेडछाड; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Molestation of a young woman : युवतीची छेडछाड; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Molestation of a young woman : नगर : बोल्हेगाव उपनगरात राहणाऱ्या युवतीची छेडछाड (Molestation of a young woman) करत तिला जबरदस्तीने घराबाहेर ओढण्याचा प्रयत्न करत मारहाण (Assault) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित २१ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे.

नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे

ऋषीकेश नागथाई, प्रसाद भंडारी (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. बोल्हेगाव) व अमोल कचरे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पीडिताने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ऋषीकेश नागथाई हा नेहमी अश्लिल नजरेने पाहणे, हातवारे करणे, शिट्ट्या वाजवणे तसेच डोळा मारणे असे प्रकार करत होता. याबाबत त्याला व त्याच्या कुटुंबीयांना वारंवार समजावून सांगण्यात आले होते. मात्र, त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही.

हे देखील वाचा: बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?

आई-वडील व भावाला मारहाण (Molestation of a young woman)

रविवारी (ता. १) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ऋषीकेश व त्याचे मित्र प्रसाद भंडारी आणि अमोल कचरे हे तिघे जण फिर्यादीच्या घराजवळ आले. त्या वेळी घरात एकटी बसलेल्या फिर्यादीला उद्देशून त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. फिर्यादी कपडे काढण्यासाठी जिन्याने वर जात असताना तिघांनी घराच्या कंपाउंड गेटमध्ये प्रवेश करून ऋषीकेश नागथाई व प्रसाद भंडारी यांनी तिचा हात जबरदस्तीने धरत तिला गेटबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने आरडाओरडा केल्यावर तिचा भाऊ, आई व वडील हे तातडीने बाहेर आले. त्यांनी फिर्यादीचा हात सोडवून जाब विचारताच तिघा संशयित आरोपींनी तिच्या आई-वडील व भावाला मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here