Monica Rajale | विकासकामे न करता विरोधकांचे वेगळ्याच विषयावर राजकारण : मोनिका राजळे

0
Monica Rajale
Monica Rajale

Monica Rajale | शेवगाव : विकासाचे आणि जनतेच्या कामाचे मुद्दे बाजूला ठेवून ही निवडणूक वेगळ्या वळणार न जाता विकासाच्या मुद्द्यावर गेली पाहिजे. या निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळतं आहे. आज जातीपातीचे दबावाचे राजकारण केले जात आहे. कुठं आपला माणूस, आपला तालुका म्हणणाऱ्यांना दहा वर्षात आपली माणसं आठवली नाहीत. परंतु निवडणूक आल्यावर गुणवंतांचा सत्कार करायला लागले, कुस्त्यांचे आखाडे भरवायला लागले, कार्यकर्त्यांना साधा काटा मोडला तरी धावत पळत यायला लागले. हे तात्पुरते प्रेम जनतेने ओळखले पाहिजे. दोन्ही उमेदवार मागील वेळी म्हणायचे ही शेवटची निवडणूक आहे, आता खोटं खोटं डोळ्याला रुमाल लावून डोळे पुसायला लागलेत, तुम्हाला एकच सांगेल, या अपक्षांच्या नादी लागून मत वाया घालू नका, असे आवाहन आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांनी मतदारांना केले आहे.

अवश्य वाचा – आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले तरी माघार नाही; भाऊसाहेब कांबळे यांचा पत्रकार परिषदेत निर्धार

राजळेंचा संवाद दौरा (Monica Rajale)

शेवगाव तालुक्यातील आखेगाव, शिंगोरी, थाटे, वाडगाव, मुर्शतपूर, सालवडगाव, खरडगाव येथे आमदार राजळे यांचा गावभेट संवाद दौरा झाला. यावेळी आखेगाव येथे आमदार राजळे बोलत होत्या. यावेळी भाऊसाहेब पायघन, अर्जुन काटे, नानाभाऊ कोल्हे, मारुती पायघन, काकासाहेब खर्चन, त्रिंबक काटे, भगवान काटे, संभाजी काटे, अशोक काकडे, बाबासाहेब गोर्डे, काशिनाथ बोरुडे, कातकडे मेजर, ठबू ससाणे, मनोज पायघन, एकनाथ काटे, सुरेश गोर्डे, ज्ञानेश्वर गोर्डे, आप्पासाहेब काटे आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.

हेही वाचा – संग्राम जगताप यांना नगर शहरातून माझ्यापेक्षा अधिक लीड देवून विजयी करा : डॉ.सुजय विखे पाटील 

पुढे बोलताना राजळे म्हणाल्या, पंकजा मुंडे यांनी मला जलसंधारण तसेच ग्रामविकासाचा मोठा निधी दिला होता. त्यामुळे विविध गावातील विकासकामे मार्गी लावता आली. आज जे जातीच्या नावाने मते मागत आहेत. त्यांनी नेमके कोणासाठी काय केले हे जनतेला माहिती आहे. लोकांना सर्व गोष्टी समजतात त्यांना तुम्ही हलक्यात घेऊ नका. काहीजण तर आता आपला तालुका म्हणतात, मग गेल्या दहा वर्षे तुम्ही तालुक्यासाठी काय केले असा प्रश्न उपस्थित करून सोसयाटीचे कर्ज देणार नाही, उस कारखान्याला घेतला जाणार नाही, अशी दमदाटी केली जात आहे. जनतेची अडवणूक झाली तर मी जनतेसोबत राहील, अशी ग्वाही राजळे यांनी यावेळी दिली. निवडणूक आली की, ही मंडळी ताजनापूर योजनेवर खुप राजकारण करतात. मी जबाबदारी पूर्वक सांगते, या दहा वर्षांत प्रत्येक बजेटमध्ये या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मागणी नुसार दरवर्षी ३० ते ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.२०१८ साली ड्रिप इरिगेशनचे सव्वाशे कोटी रुपयांचे टेंडर करुन घेतले आहे. टाकीपर्यंत पाणी आले, चाचणी घेत असताना चापडगाव परिसरातील दोन बंधारे भरुन घेतले. परंतु ज्यांचा काही संबंध नाही ते मंडळी तिथं जाऊन नारळ फोडत आहेत. हा खोटारडेपणा आता नागरिकांनी ओळखला पाहिजे.आखेगाव सह तेरा गावांना पाणी देण्यासाठी उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री यांच्या सोबत बैठक घेतली. तीन आठवड्यात तांत्रिक मान्यता मिळून त्याचा अध्यादेश आला, त्याचेही राजकारण केलं गेलं, असे राजळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here