Monica Rajale : पाथर्डी व शेवगावतील विजेचे प्रश्न सुटणार : राजळे

Monica Rajale : पाथर्डी व शेवगावतील विजेचे प्रश्न सुटणार : राजळे

0
Monica Rajale : पाथर्डी व शेवगावतील विजेचे प्रश्न सुटणार : राजळे
Monica Rajale : पाथर्डी व शेवगावतील विजेचे प्रश्न सुटणार : राजळे

Monica Rajale : पाथर्डी : पाथर्डी व शेवगावतील प्रलंबित विजेचे प्रश्न लवकरच सुटणार आहेत. त्याबाबत ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे (Monica Rajale) यांनी दिली. मतदारसंघातील विजेच्या समस्येबाबत ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्मल भवन (मुंबई) (Mumbai) येथे महावितरणच्या (Mahavitaran) अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

अवश्य वाचा : मी आरोपांवर उत्तर देत नाही’;कुणाल कामराच्या गीतावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया  

मंत्री महोदयांची भेट घेऊन विजेचे प्रलंबित प्रश्न केले उपस्थित

मतदार संघातील दोन्ही तालुक्यांमध्ये विजेच्या अनेक समस्या असल्याने आमदार राजळे यांनी प्राधान्य देत या संदर्भात मंत्री महोदयांची भेट घेऊन असलेले विजेचे प्रलंबित प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांसमोर बैठक लावण्याची मागणी केली. त्याला बोर्डीकरांनी सकारात्मक प्रतिसाद देत बैठक आयोजित केली होती. 

नक्की वाचा : कॉमेडियन कुणाल कामराची चार पानी पोस्ट चर्चेत;पोस्टमध्ये नेमकं काय ?  

या बैठकीदरम्यान आमदार राजळे म्हणाल्या की, (Monica Rajale)

मतदारसंघातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांच्या विजेच्या प्रश्नासाठी अनेक कामे करणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्राधान्याने रोहीत्रांची क्षमता वाढवणे, शेतीपंप व सिंगल फेज योजनेत नवीन गावा समवेत वाडया-वस्त्यांचा समावेश करणे, आर.डी.एस.एस. योजनेअंतर्गत ओव्हरलोड रोहीत्रांची क्षमता वाढ करुन नवीन रोहीत्र टाकणे, उपकेंद्राची क्षमता वाढवणे, मजलेशहर, अमरापुर, जवखेडे खालसा या मंजूर उपकेंद्राची निविदा प्रक्रिया करुन तातडीने काम सुरु करावे, अशी मागणी आमदार राजळे यांनी केली. महावितरणचे काम करताना  रिक्त असलेल्या उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता ही महत्वाची पदे तातडीने भरावी, अशी मागणी केली गेली. या सर्व मागण्याबाबत बोर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले. या बैठकीसाठी ऊर्जा विभागाचे संचलन संचालक अरविंद भादीकर, प्रकल्प संचालक प्रसाद रेश्मे, कार्यकारी संचालक वितरण दत्तात्रय पडळकर, पायाभुत आराखडा कार्यकारी संचालक धनंजय औढेंकर, मुख्य अभियंता पंकज तगडपल्लीवार, मुख्य अभियंता अंकुर कावळे, अधिक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे आदी उपस्थीत होते.