Monika Rajale : शेवगाव : लोकसहभागातून सुरू असलेले ढोरा नदी खोलीकरणाचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद केले होते. त्यानंतर सामनगाव (ता.शेवगाव) येथील ग्रामस्थांनी आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्याकडे धाव घेतली. कासार पिंपळगाव (ता.पाथर्डी) येथे त्यांच्या निवासस्थानी शेकडो ग्रामस्थांनी आम्हाला पाण्यासाठी न्याय (Justice) द्या, म्हणत टाहो फोडला. कायम दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईशी (Water Shortage) दोन हात करणाऱ्या महिलांना यावेळी अश्रू अनावर झाले.
हे देखील वाचा: शिक्षक मतदारसंघात रंगणार विखे-कोल्हे संघर्ष; राजेंद्र विखे पाटील दाखल करणार आज उमेदवारी अर्ज
महसूल विभागाकडून गौण खनिजाचे कारण
सततच्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या सामनगाव येथील ग्रामस्थांनी त्यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून ढोरा नदी व बंधारा खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. गेल्या ३ एप्रिलपासून लोकवर्गणीतून सुरू असलेले हे काम सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात आहे. मात्र, स्थानिक राजकीय द्वेषातून झालेल्या तक्रारींची शहनिशा न करता महसूल विभागाच्या पथकाने गौण खनिजाचे कारण पुढे करत काम बंद करण्यास भाग पाडले. लोकसहभागातून सुरू असलेले काम अशा पध्दतीने बंद करण्यात आल्याने पाण्यासाठी सुरु असलेली गावची वाटचाल थांबली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाविरोधात महिला व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.आता तुम्हीच आमच्या मायबाप आहात, तुम्हीच आम्हाला न्याय द्या, ग्रामसभेने रितसर ठराव व परवानग्या घेऊन, सर्व रेकॉर्ड पारदर्शी पध्दतीने ठेवलेले असताना केवळ किरकोळ राजकीय द्वेषातून केलेली कारवाई अन्यायकारक आहे.
नक्की वाचा: नगर, शिर्डी लाेकसभा काेण जिंकणार? एक्झिट पोलने काय वर्तविले भाकीत?
राजळेंकडून प्रांताधिकाऱ्यांना तातडीने आदेश (Monika Rajale)
पावसाळा तोंडावर आहे काम पूर्णत्वास जात असताना महसूल प्रशासनाने पाण्याच्या शाश्वत स्त्रोताच्या उपलब्धतेसाठी लढणाऱ्या गावांना अशा पध्दतीने नाऊमेद करणे चुकीचे आहे. याबाबत आमदार राजळे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत प्रांताधिकारी प्रसाद मते यांना तातडीने तेथे बोलावून घेत प्रत्यक्ष कामाची पाहणी करून सकारात्मक निर्णय घेण्याचा आदेश दिला. यावेळी उमेश भालसिंग, संदिप सातपुते, भगवान कापरे, शिवाजी भिसे, भिमराज सागडे, मधुकर वावरे, सरपंच आदिनाथ कापरे, उपसरपंच संगिता नजन, सुनिता नजन, कानिफ म्हस्के, भागवत लव्हाट, बाबासाहेब गाडगे, राजेंद्र जमधडे, सुधीर म्हस्के, गणेश म्हस्के, भारत म्हस्के, दत्तात्रय दातिर, राजेंद्र जमधडे, झुंबरबाई दहिफळे, मिरा फाटके, व्दारका कापरे, सुनिता कापरे, लताबाई मिसाळ आदीसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.