Monika Rajale : शेवगाव : शेवगाव-ताजनापूर योजनेवर चर्चा सुरु केली की समजून जायचे निवडणूक (Election) आली आहे. निवडणूक प्रचारात (Election Campaign) गावासाठी काय दिले, काय करणार हे न सांगता, जातीपातीचे राजकारण सुरु करायचे. त्यांच्याकडे विकासकामांचे मुद्दे नसल्याने, विकासाच्या मुद्द्याला बगल द्यायची, दहा वर्षात तालुका मागे पडला म्हणायचा, जर तुम्ही दहा वर्षात मतदारसंघात फिरले असते तर विकासकामे दिसली असती. तुमच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी केले.
अवश्य वाचा : विकासकामे न करता विरोधकांचे वेगळ्याच विषयावर राजकारण : मोनिका राजळे
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
आमदार राजळे यांनी शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव, कुरुडगाव रावतळे, वरुर, भगुर, आव्हाणे, दिंडेवाडी, बऱ्हाणपूर, मळेगाव, भातकुडगाव, आखतवाडे, आपेगाव, गरडवाडी, ढोरजळगाव, सामानगाव, लोळेगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला. वरुर येथे झालेल्या कार्यक्रमात दिनकर अंचवले महाराज, भिमराव फुंदे, सचिन म्हस्के, भानुदास सोनटक्के, मारुती लव्हाट, विठ्ठल झिरपे, केशव म्हस्के, गणपत शिंदे, संजय देवडकर, संजय मोरे, बाबासाहेब धायतडक, प्रकाश म्हस्के, भागवत झिरपे, भाऊसाहेब वावरे, किसन म्हस्के, संजय मोरे, दीपक भुसारी, बापूनाना पिसोटे, रवींद्र वायकर, आशाताई गरड, मारुती खांबट, गणेश म्हस्के, अंबिका लव्हाट, अजिंक्य लव्हाट आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून अवकाळीची शक्यता!
आमदार राजळे म्हणाल्या, (Monika Rajale)
कारखान्याला मदत हवी होती, त्यावेळी अजितदादांच्या गटात आले. दिडशे कोटी रुपये निधी मिळाला, लगेच पलटी मारली. त्यांनी देखील यापूर्वी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले, त्यांच्या कार्यकाळात बसस्थानक, शहर पाणी योजना, ताजनापूर योजना, रस्ते, आदी प्रश्न होते. इतक्या वर्षापासून महिलांचे पाण्यासाठीचे सुरु असलेले हाल त्यांना दिसले नाहीत. मी महिला असल्याने त्यांचे दुःख वेदना मला जाणवल्या. त्यामुळे प्राधान्याने पाणी प्रश्नावर पाठपुरावा करुन पाणी प्रश्न मार्गी लावला. बसस्थानक, विविध रस्त्यांचे कामे मार्गी लावली. त्यावेळी त्यांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणीही अडवले नव्हते. प्रत्येक गावात किमान एक कोटी निधी देऊन विविध प्रश्न मार्गी लावले. क्वचित एखाद्या गावाला कोटी पेक्षा कमी निधी मिळाला असेल. पण भेदभाव न करता जनतेचे हित लक्षात घेऊन कामे केल्याचे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.