Monika Rajale : शेवगाव : महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यात मराठा समाजाचे एक लाख युवकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या वतीने अर्थसहाय्य देऊन नव उद्योजक बनविले. महाविकास आघाडीचे नेते राज्यकर्ते होते, त्यावेळेस आण्णासाहेब पाटील महामंडळ शेवटच्या घटका मोजत होते. आरक्षणाचे राजकारण करणाऱ्यांनी त्यांची सत्ता असताना आरक्षण का दिले नाही. पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी मोनिका राजळे (Monika Rajale) यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे (Annasaheb Patil Economically Backward Development Corporation) अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केले.
अवश्य वाचा : विकासकामे न करता विरोधकांचे वेगळ्याच विषयावर राजकारण : मोनिका राजळे
तालुक्यातील लाभार्थ्यांचा मेळावा
शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या वतीने तालुक्यातील लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी गुजरातचे आमदार महेशजी कासवाल, संकेत कळंबे, बापूसाहेब भोसले, कृष्णा राजळे, अशोकराव गायकवाड, विवेक नाईक, भीमराज सागडे, उमेश भालसिंग, सागर फडके, जे. बी. वांढेकर, महेश फलके, मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष किशोर मरकड यांच्यासह शेकडो युवा उद्योजक उपस्थित होते.
नक्की वाचा : जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून अवकाळीची शक्यता!
नरेंद्र पाटील म्हणाले, (Monika Rajale)
राज्याच्या प्रत्येक तालुक्यात एक हजार उद्योजक आण्णासाहेब पाटील मंडळामार्फत तयार करण्याचा मानस आहे. महायुतीच्या सरकारच्या काळात सारथी, बार्टी महाज्योतीच्या माध्यमातून शैक्षणिक मदत मिळालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या व केंद्राच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. नवउद्योजक घडविण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार आले पाहिजे. आमदार मोनिका राजळे यांनी गेल्या दहा वर्षात चांगली विकासाची कामे केली आहेत त्यांना पुन्हा निवडून देऊन हॅटट्रीक करावी, असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खरड तर सूत्रसंचालन सोमेश्वर शेळके यांनी केले.