Monika Rajale : प्रताप ढाकणेंचे कुठे चुकले गणित; मोनिका राजळेंनी अशी साधली हॅटट्रिक

Monika Rajale : आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांवर मात करत कशी साधली हॅट्रिक

0
Monika Rajale : आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांवर मात करत कशी साधली हॅट्रिक
Monika Rajale : आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांवर मात करत कशी साधली हॅट्रिक

Monika Rajale : पाथर्डी : शेवगाव पाथर्डी मतदार संघातील मतदारांनी आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांना विजयचा कौल देऊन मोठ्या मताने विजय केले. आमदार राजळे यांनी तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक (Assembly Elections) जिंकून विजयाची हॅट्रिक केली आहे. निवडणुकी आखाड्यामध्ये आमदार मोनिका राजळे यांनी जोरदार बँटीग करून विरोधकावर मात केली आहे. निवडणुकीतील विजयाचे सर्व गणिते बदलून अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule), राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अँड. प्रतापराव ढाकणे (Prataparav Dhakane) यांना धोबपछाड केले. जनशक्तीच्या हर्षदा काकडे यांना हि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चितपट केले. संयमी, शांत, मितभाशी, मतदार संघातील विकास कामे व जनसंपर्क याच्या जोरावर तिसऱ्यांदा आमदारकी आपल्याकडे ठेवण्यात त्यांना मोठे यश मिळाले आहे.

Monika Rajale : आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांवर मात करत कशी साधली हॅट्रिक
Monika Rajale : आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांवर मात करत कशी साधली हॅट्रिक

अवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचा दणदणीत विजय; विखे ठरले किंगमेकर

लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे सहकार्य ही जमेची बाजू

शेवगाव पाथर्डी व आधीचा शेवगाव नेवासा या मतदार संघात गेल्या पन्नास वर्षापासुन तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान कोणत्याही उमेदवारांना मिळाला नाही. मात्र आमदार मोनिका राजळे या मतदार संघातुन तिसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांचा विक्रम झाला आहे. त्यांनी केलेली विकास कामे, सोज्जवळ व शांत स्वभाव, सतत असणारा संपर्क आणी लाडकी बहीन योजनेचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला. लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे सहकार्य ही मोनिकाताईंची जमेची बाजू ठरली आहे.

नक्की वाचा : ‘आमचं आम्ही बघू’,मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांचं वक्तव्य

११ हजार ३६७ मतांनी राहिल्या आघाडीवर (Monika Rajale)

निवडणुक प्रचार दरम्यान सर्व विरोधकांनी राजळे यांना लक्ष केले होते जातीपातीचे राजकारण, मतविभागणी असा बोभाटा झाला मात्र मतदारांनी त्याला थारा न देत आ.राजळे यांच्यावर विश्वास व्यक्त केला. मतमोजणी चालु होताच शेवगाव तालुक्यातुन अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी मतात आघाडी घेतली परंतु त्यांना अपेक्षीत असे मते न मिळाल्याने १३ व्या फेरीपासुन आ.राजळे यांना आघाडी मिळत गेली. शेवगाव शहरातुनही त्यांना सुमारे ३ हजार ८०० मताधिक्य मिळाले. तर ॲड. प्रताप ढाकणे यांनाही अपेक्षीत मतदान मिळत गेले नाही त्यामुळे एकविसाव्या फेरी अखेर राजळे २५ हजार ४६७ मतांचे मताधिक्य राहिले आणी त्या ११ हजार ३६७ मतांनी आघाडीवर राहिल्या.

पाथर्डी तालुक्यात भालगाव व टाकळीमानुर गटात ॲड. प्रताप ढाकणे यांना चांगली मते मिळतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती मात्र या दोन्ही गटात राजळेंना मिळालेली मते लक्षणीय ठरली. राजळे यांचे मताधिक्य जसे वाढत गेले तसा कार्यकर्त्यांनी जल्लोस सुरू केला . राजळे यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळीत फटाक्याच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा केला. आमदार राजळे यांना मतदारसंघातील प्रत्येक गावातून मताच्या रूपाने मतदारांनी आशीर्वाद दिला. निवडणुकीत शेवगाव पाथर्डी मतदारसंघात विशेषता पाथर्डी तालुक्यात ज्या पद्धतीने निकालाचा अंदाज वर्तवला गेला तसा फारसा विरोधकांना त्याचा झाला नसून शेवगाव बरोबर पाथर्डी तालुक्याने ही राजळे यांना अपक्ष प्रमाणे ही चांगली मते दिली आहे. ज्या पद्धतीने अनेक तर्क , वितर्क आणि विजयाचे अंदाज बांधले गेले होते ते सर्व अंदाज खोल ठरवत आमदार राजळे यांनी पुन्हा एकदा शेवगाव पाथडी विधानसभा मतदारसंघावर आपला डंका वाजवला आहे.

या निवडणुकीसाठी प्रांताधिकारी निवडणुक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी काम पाहिले, शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे, पाथर्डीचे तहसीलदार उध्वव नाईक यांनी सहकार्य केले. मतदार संघाचे निरीक्षक म्हणुन रणजीता यांनी मार्गदर्शन केले. पोलिस उपअधिक्षक सुनिल पाटील, पोलिस निरीक्षक समाधान नागरे व संतोष मुटकुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

महायुती मधील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीमध्ये प्रचार करून विजयश्री खेचून आणला आहे. मतदारांनी विकासाच्या बाजूने कौल देत पुन्हा एकदा मला आमदार करून काम करण्याची संधी दिली आहे. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना, शेतकरी, तरुणांसाठी घेतलेले चांगले निर्णय मतदारांपर्यंत घेऊन गेलो. आता मतदारसंघांमध्ये रोजगार, शेतीसाठी शाश्वत पाणी, एमआयडीसी असे प्रकल्प उभा करून शेवगाव पाथर्डी विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ. विरोधकांच्या टिकेकडे लक्ष न देता विकासाच्या माध्यमातून आपले काम सुरू ठेवणार आहे. असे आमदार राजळे यांनी आपल्या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.