Monika Rajale : पाथर्डी : सेवानिवृत्त शिक्षकांच्या (Retired Teachers) अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक लक्ष घालून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी दिले. सेवानिवृत्तांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पाथर्डीत शिक्षक भवनासाठी (Teachers Building) जागा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेऊ असेही राजळे यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा
सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करणे हा या मेळाव्याचा उद्देश
पाथर्डी तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व पेन्शन संघटनेच्या वतीने तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा मेळावा पाथर्डी येथे आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. ७० ते १०० वर्षे वयोगटातील वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एन. डी. मारणे होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शिक्षकांची पिळवणूक (Monika Rajale)
एन. डी. मारणे म्हणाले , सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या निवृत्तीवेतन सुधारणा, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणी तसेच सेवानिवृत्तीनंतरचे लाभ वेळेत मिळत नसल्याने शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक समस्या आणि प्रश्न शासन दरबारी प्रलंबित राहत असल्याची खंत व्यक्त केली. अन्यायकारक कपात, उपदान व ग्रॅच्युएटी मिळण्यात होणारा विलंब यामुळे शिक्षकांची पिळवणूक होते. केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनानेही सेवानिवृत्तांसाठी आरोग्य भत्ता लागू करावा व पाथर्डीत शिक्षक भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पेन्शन वेळेवर जमा करण्याची मागणी
यावेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी सेवानिवृत्त शिक्षकांसाठी जागा व सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अहिल्यानगर संघटनेचे अध्यक्ष द. मा. ठुबे यांनीही सेवानिवृत्तांच्या समस्या गांभीर्याने मांडत पेन्शन वेळेवर जमा करण्याची मागणी केली. कार्यक्रमात डॉ. संजय गीते व पोपट इथापे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष द. मा. ठुबे, पाथर्डी पेन्शन संघटना तालुकाध्यक्ष प्रमोद भावसार, डॉ. संजय गीते, पोपट इथापे, सु पा वांढेकर, लक्ष्मण आंधळे, कारभारी डफळ, सुरेश माघाडे आदी उपस्थित होते.



