Monika Rajale : भाजपकडून स्वच्छ चेहरा असलेला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात : मोनिका राजळे

Monika Rajale : भाजपकडून स्वच्छ चेहरा असलेला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात : मोनिका राजळे

0
Monika Rajale : भाजपकडून स्वच्छ चेहरा असलेला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात : मोनिका राजळे
Monika Rajale : भाजपकडून स्वच्छ चेहरा असलेला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात : मोनिका राजळे

Monika Rajale : पाथर्डी : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा महायुतीकडून जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना उमेदवारी देण्यात आली असून स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे मतदारसंघातील विकास कामाचे मोठे कार्य त्याचबरोबर त्यांनी पक्षासाठी  निभावलेली प्रामाणिक भूमिका यामुळेच अक्षय कर्डिले यांना पक्षाने उमेदवारी जाहीर करून मतदारसंघाच्या विकास कामासाठी स्वच्छ प्रतिमा असलेला चेहरा जनतेसमोर दिला. निश्चितपणे अक्षय कर्डिले यांना पाथर्डी तालुक्यातील ३९ गावातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा विश्वास पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा : ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल

अक्षय कर्डिले यांना साथ देण्याचे आवाहन

या पोटनिवडणुकीसाठी ३९ गावातील प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकतीनिशी आमदार कर्डिले यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी युवा नेते अक्षय कर्डिले यांना खंबीरपणे साथ देण्याचे आवाहन केले. सोमवारी युवानेते अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे त्या अनुषंगाने तिसगाव येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात ३९ गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार राजळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Monika Rajale)

कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता राहुरी मतदार संघात स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी रक्ताचे पाणी करत या मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्य दिले. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात धावून जाण्याचे काम या नेत्याने केले. गोरगरिबांना नेहमी ताकद देण्याचे काम आमदार कर्डिले यांनी केले.

त्यामुळे त्यांचे विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन अक्षय कर्डिले देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या मैदानात उतरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्यासह राहुरी -नगर -पाथर्डी मतदारसंघातील महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकतीनिशी उतरणार असून अक्षय कर्डिले यांना आमदार करून खऱ्या अर्थाने आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करतील असा विश्वास आमदार राजळे यांनी व्यक्त केला

विकासकामे मार्गी लावण्यासाठी कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे महत्त्वाचे

राज्यात आणि देशात भाजपा महायुतीचे सरकार असल्यामुळे या मतदारसंघात देखील विकासकामे मार्गी लावण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे महत्त्वाचे असल्याचेही आमदार राजळे यावेळी म्हणाल्या. यावेळी दीपक लांडगे, माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे, ज्येष्ठनेते बाळासाहेब अकोलकर, सुभाषराव बुधवंत, मार्केट कमिटीचे चेअरमन सुभाषराव बर्डे,सुनील साखरे, महादेव कुटे, संभाजी वाघ, संतोष शिंदे,विक्रमराव ससाने, गणेश पालवे,नारायण कराळे, अण्णासाहेब वांढेकर, सु पा वांढेकर,आबासाहेब अकोलकर, आदिनाथ कराळे, संजय पाखरे, अशोक दहातोंडे, दत्तात्रय मराठे, तुकाराम वांढेकर, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, युवानेते कुशल भापसे, धीरज मैड,पृथ्वीराज आठरे,सुनील परदेशी नंदकुमार लोखंडे चेअरमन भारत गारुडकर साहेबराव गवळी डॉक्टर यशवंतराव गवळी,जिजाबापू लोंढे,अरुण रायकर, राजूमामा तागड,विजयकुमार कोरडे, भैय्या बोरुडे, पंकज मगर,सोमनाथ कातखडे,सरपंच कानिफ पाठक,सचिन वायकर, कारभारी गवळी, अण्णासाहेब शिंदे,किरण गर्जे,बापूसाहेब कुटे, रवींद्र भापसे, प्रणिल सावंत,यांच्यासह 39 गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.