Monsoon : नगर : दिवसेंदिवस वाढत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना आता मिळणार दिलासा मिळणार आहे. कारण अखेर केरळमध्ये मान्सून (Monsoon) दाखल झाला आहे. मान्सून केरळात (Kerala) दाखल होण्यासाठी हवामान विभागाने (Department of Meteorology) ३१ मे ही संभाव्य तारीख असल्याचे सांगितले होते. पण, यंदाच्या वर्षी हे मोसमी वारे ठरल्या मुहूर्ताआधीच केरळमध्ये दाखल झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा: मुलगी दिली नाही म्हणून मौलनानेच मुलीच्या बापाचा केला खून
वेळेत मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
गेल्या काही दिवसांपासून मान्सून कधीपासून सुरू होईल याची वाट राज्यातील शेतकरी पाहत आहे. गेल्या वर्षी मान्सून उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले होते. यामुळे यावर्षीही पाऊस वेळेत सुरू होईल की नाही यावरुन शेतकरी चिंतेत होते. मान्सून उत्तर-पूर्व भारत आणि केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नक्की वाचा : ‘चित्रपटानंतर गांधींना ओळख मिळाली त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं’- मोदी
एक दिवस आधीच मान्सून केरळात दाखल (Monsoon)
पुढील दहा दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हावामान विभागाने सांगितले आहे. प्रत्येकवर्षी मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होतो. यंदा मान्सून ३१ मे रोजी केरळात येईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. पण एक दिवस आधीच म्हणजे ३० मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला असून पुढच्या प्रवासात गती असल्याचेही दिसत आहे.