Monsoon 2024 : देशात १०६ टक्के पाऊस पडणार;महाराष्ट्रालाही दिलासा 

महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असं भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तवलं आहे.

0
Monsoon 2024
Monsoon 2024

नगर : उन्हाळ्याने अंगाची लाही लाही होत असताना दिलासा देणारी एक बातमी भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे. यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी आज (ता.१५) पावसाचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली.

नक्की वाचा : मराठीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर येणार चित्रपट

यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक राहणार (Monsoon 2024)

भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला आहे. यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक राहणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, असं भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तवलं आहे. महापात्रा म्हणाले, यंदा सामान्य हून अधिक पावसाचा अंदाज आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान १०६ टक्के पाऊसाचा अंदाज आहे. यंदा सामान्य पेक्षा चांगली परिस्थिती आहे. आठ जूनपर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे.

अवश्य वाचा : अयोध्येत रामनवमी निमित्त तब्बल ‘एवढ्या’ किलोंचे लाडू पाठवले जाणार

भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज (Monsoon 2024)

अल निनोची परिस्थिती सध्या मध्यम आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपला असेल. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल, याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सून संदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस होतो,अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here