Weather Update : महाराष्ट्रात सध्या सगळीकडे मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय (Monsoon Active) झाला आहे. आज मुंबई, रायगड,पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहिल,असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
नक्की वाचा : धक्कादायक!बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार
राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी (Weather Update)
हवेचा दाब अनुकूल होत असल्यामुळे राज्यात २५ ऑगस्टपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. येत्या ७२ तासांमध्ये या दोन्ही शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मान्सून २५ ऑगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत असे सलग तीन आठवडे सक्रिय राहणार आहे. आज संपूर्ण राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. तर मराठवाड्यात कमी प्रमाणात पाऊस सुरू आहे. केरळ ते गुजरात भागात पुन्हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे. त्यामुळे मान्सून राज्यात सक्रिय होत आहे.
अवश्य वाचा : बाहुबलीच्या कालकेयची मराठीत एन्ट्री,अभिनेते प्रभाकर मराठीत झळकणार
संपूर्ण राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट (Weather Update)
मुंबई, पुणे या दोन्ही शहरांना आज सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गोवा आणि कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यात पुढील काही दिवस पाऊस सक्रीय असेल,असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी धरणसाठ्यातील पाणीसाठा वाढला असल्याचं चित्र दिसून येत आहे.