Monsoon Update: राज्यातील विविध भागात आता मान्सून (Monsoon) दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मान्सूनने महाराष्ट्रातील काही भाग व्यापला असून मुंबईसह पुणे (Pune) आणि सोलापुरातही (Solapur) नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला आहे. पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
नक्की वाचा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत’-संजय राऊत
पावसाचा रेड अलर्ट ‘या’ ठिकाणी जारी (Monsoon Update)
आज ठाणे, मुंबई ,रायगड ,रत्नागिरी, पुणे व साताऱ्याच्या घाट परिसरात, पावसाचा रेड अलर्ट आहे. आज पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड ,लातूर व धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे.
अवश्य वाचा : भारताचा नवा कसोटी कर्णधार बनला शुभमन गिल
पुण्यात मान्सून दाखल (Monsoon Update)
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाची संततधार सुरू आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून काल (ता.२५) रात्रीपासून मुंबईसह पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच कोकणपट्टीवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली. अजूनही अनेक भागात पाऊस सुरू आहे. पुण्यात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. मागील दोन दिवसांपासून पुण्यात पावसाचा जोर वाढला असून इंदापूर, दौंड, बारामती या परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे.