Monsoon Updates :आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये ‘या’ तारखेला दाखल होणार

0
Monsoon Updates:आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये 'या' तारखेला दाखल होणार
Monsoon Updates:आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये 'या' तारखेला दाखल होणार

Monsoon Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहे. मात्र मान्सून (Monsoon) भारतात कधी येणार,याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. यंदा मान्सून नेहमीपेक्षा आधी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील चार-पाच दिवसांत केरळमध्ये (Monsoon in kerala) मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता मान्सून कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होईल,असा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.

नक्की वाचा : छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री;मंत्रिपदाची घेतली शपथ   
लक्षद्वीप क्षेत्राचा काही भाग, केरळ, तामिळनाडूचा काही भाग, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. २७ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, त्यापूर्वीच पाऊस केरळमध्ये दाखल होईल, अशी चिन्हं दिसत आहेत.

अवश्य वाचा : ‘चिडिया’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ‘हे’ कलाकार झळकणार  

राज्यभरात दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ (Monsoon Updates)

केरळसह तामिळनाडू राज्याला आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज २० मे रोजी राज्याला ऑरेंज अलर्ट तर कोकणला उद्या २१ मे रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला उद्या २१ मे रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हा पाऊस २२ मे पर्यंत राहणार असून २३ मे नंतर पावसाला ब्रेक लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय ? (Monsoon Updates)

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्याच्या विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. १७ मे पासून २५ मे पर्यंत पूर्वमोसमी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. हा पाऊस दोन दोन दिवसांच्या अंतराने कोसळणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी मशागतीला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक असेल, शेतकऱ्यांनी ३० मे पर्यंत आपली शेतजमीन मशागत करून तयार ठेवावी, असा सल्लाही पंजाब डख यांनी दिला आहे. मान्सून केरळमध्ये २५ ते २७ मेपर्यंत दाखल झाल्यास त्यानंतर आठवडाभराच्या अवधीत कोकणात मान्सूनचे आगमन होईल.