Morcha : संविधान प्रेमी नागरिकांचा राहाता येथे मोर्चा; प्रशासनाला निवेदन 

Morcha : संविधान प्रेमी नागरिकांचा राहाता येथे मोर्चा; प्रशासनाला निवेदन 

0
Morcha : संविधान प्रेमी नागरिकांचा राहाता येथे मोर्चा; प्रशासनाला निवेदन 
Morcha : संविधान प्रेमी नागरिकांचा राहाता येथे मोर्चा; प्रशासनाला निवेदन 

Morcha : राहाता : परभणी येथील घटनेचा निषेध त्याचप्रमाणे संसद भवनात (Parliament) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या अवमानकारक वक्तव्याचा तसेच सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या घटनांच्या निषेधार्थ राहाता शहरात आंबेडकर प्रेमी व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने मोर्चा (Morcha) काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 

नक्की वाचा : चोराचा शोध घेण्यासाठी बस थेट पोलीस ठाण्यात

मोर्चामध्ये काळ्या फिती लावून निषेध नोंदवला

सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंबेडकर प्रेमी नागरिक एकत्रित जमले. या घटनांच्या निषेधार्थ अनेक युवकांनी काळा ड्रेस परिधान करून व काळ्याफिती लावून निषेध नोंदवला. मोर्चा प्रारंभी स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौक ते पोलीस स्टेशनपर्यंत चालत जाऊन मोर्चेकरांनी पोलीस स्टेशन समोर शिर्डी नगर महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान अमित शहा यांच्या निषेधार्थ जोरजोरात घोषणा दिल्या. त्याचप्रमाणे यावेळी परभणी येथील घटनेचा व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हस्ते जबाबदार असणाऱ्या पोलिसांचा सुद्धा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, सिमोन जगताप , गौतम गायकवाड, सचिन चौगुले, विशाल कोळगे, प्रदीप बनसोडे, रिपाईचे सुरेंद्र थोरात, संध्या थोरात, प्रभावती घोगरे, रशीद शेख आदींची भाषणे झाली. या सर्वांनी या तीनही घटनांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. निषेधार्थ घोषणानंतर उपस्थित संविधान प्रेमी व आंबेडकर प्रेमी जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करत महसूल विभागाचे नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

अवश्य वाचा : भारतातील अर्थक्रांतीचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी (Morcha)

ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. निवेदनानंतर आंबेडकर प्रेमी नागरिकांनी मोर्चा विसर्जित केला. या मोर्चा प्रसंगी प्रदीप बनसोडे, धनंजय निकाळे, राजेंद्र पाळंदे, गणेश निकाळे यांच्यासह उद्योजक मुन्नाभाई शहा, हरदास गायकवाड, गंगाधर गमे, आसिफ खाटीक, पंकज लोंढे, मुन्ना खाटीक, ॲड.राज बनसोडे, विजयराव शिंदे, भागवतराव आरणे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.