Morcha : लहू शक्ती, भीम शक्तीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Morcha : लहू शक्ती, भीम शक्तीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
Morcha : लहू शक्ती, भीम शक्तीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Morcha : लहू शक्ती, भीम शक्तीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Morcha : नगर : मातंग समाजाच्या (Matang Samaj) तरुणावर हल्ला करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत (Mcoca Act) कारवाई करावी. तसेच मातंग समाजाला जाहीर सभेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून संबंधितावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी लहू शक्ती व भीम शक्तीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा (Morcha) काढण्यात आला होता. यावेळी मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे

लहूजी वस्ताद चौकातून मोर्चाला प्रारंभ

समाजाच्या न्याय मागण्यांकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या उद्देशाने हा मोर्चा शांततामय पार पडला. सोमवार (ता. १०) रोजी क्रांतीगुरू लहूजी वस्ताद चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. पत्रकार चौक, तारकपूर बसस्थानक, डी.एस.पी. चौक – महापालिका कार्यालय – जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता.

अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर (Morcha)

जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत पाच ठोस मागण्या केल्या. जाहीर सभा घेऊन मातंग समाजाला शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. तसेच अनु. जातीचे अ, ब, क, ड वर्गीकरणाचे प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत. संजय वैरागर हल्ला प्रकरणात आरोपींवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी. तसेच दलित समाजावर खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.